आपला देश नरकात जात आहे...कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया: We have to save our country former us president donald trump first reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

Donald Trump: आपला देश नरकात जात आहे...कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या सर्व घटनेनंतर ट्रम्प यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. आपला देश नरकात जात आहे. अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर दिली आहे.

पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर ट्रम्प यांनी नागरिकांशी संवाद साधला. फ्लोरिडातील आपल्या घरी पोहोचलेले डोनाल्ड ट्रम्प आपल्या समर्थकांना संबोधित दिसले.

काय म्हणाले ट्रम्प?

आपला देश आपल्याला वाचवायचा आहे. अमेरिकेत असे काही घडू शकते असे मला कधीच वाटले नव्हते, निर्भयपणे माझ्या देशाचे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅनहॅटन जिल्हा ऍटर्नी अॅल्विन ब्रॅग यांना फटकारले.

तसचे, सध्या अमेरिकेची परिस्थिती वाईट आहे. माझ्याकडून चुकीचे घडले असे माझ्या विरोधकांनाही वाटते. अमेरिकेत माझ्यासोबत असे होऊ शकते याचे लोकांना आश्चर्य वाटते. माझ्यासोबत असे होईल असे वाटले नव्हते.

आगामी निवडणुकीत मला पाडण्याचे हे षडयंत्र आहे. पण मी थांबणार नाही, पुन्हा उभा राहीन. असंही ट्रम्प यावेळी ठामपणे सांगितले.

अनेक देश अमेरिकेवर आण्विक हल्ल्याची धमकी देत ​​आहेत. ही सहनशक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. मला माझ्या महान देशाची सेवा करायची आहे. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाले नसते. हे जो बिडेन सरकारचे अपयश आहे. असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.