अमेरिकेची पुनर्बांधणी करू- ट्रम्प (संपूर्ण भाषण)

संग्राम शिवाजी जगताप
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

जागतिक समुदायाला मी सांगू इच्छितो की, आम्ही अमेरिकेच्या हिताला सदैव प्राधान्य देऊ, मात्र अगदी प्रत्येकाशी योग्य व्यवहार करू. सर्व लोक आणि इतर सर्व देशांसोबत आम्ही वैमनस्य, भागीदारी किंवा संघर्ष नव्हे, तर सामाईक दुवा शोधू... आणि आता या ठिकाणी, हा ऐतिहासिक विजय मिळविण्यात खरोखर ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानू इच्छितो. 

सर्व अडथळे, विरोधातील मतचाचण्या आणि अनपेक्षित भाकिते या सर्वांचे ओझे सहज दूर सारत डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची लढत जिंकली. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. न्यूयॉर्कमधील हिल्टन हॉटेल येथे ट्रम्प यांच्या समर्थकांनी गर्दी करीत एकच जल्लोष केला. ट्रम्प यांनीही उत्स्फूर्तपणे अमेरिकन नागरिकांना उद्देशून भाषण केले... 

थॅंक यू, थॅंक यू व्हेरी मच एव्हरीवन. तुम्हाला प्रतीक्षा करायला लावल्याबद्दल क्षमस्व. (अध्यक्षपदाचं) काम बिकट... हे काम बिकट आहे.. (कॉंप्लिकेटेड बिझनेस). 
सेक्रेटरी (परराष्ट्रमंत्री) क्‍लिंटन यांनी आताच माझे फोनवरून अभिनंदन केले. हे आपलं अभिनंदन आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीबद्दल मी हिलरी यांचं अभिनंदन केलं. माझ्या मते त्यांनी कडवी लढत दिली. हिलरी यांनी दीर्घकाळ खूप कष्ट घेतले. त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल आपण कृतज्ञतापूर्वक त्यांचे देणे लागतो, असे मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटते. आता या राजकीय भेदाच्या जखमा भरण्याची वेळ आली आहे. अमेरिकेतील सर्व रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्‌स आणि स्वतंत्र विचारांच्या लोकांनी एकसंध समाज म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं मी मानतो. 

अध्यक्ष या नात्याने मी सर्व अमेरिकन लोकांचा आहे. ज्या लोकांनी समर्थन दिले नाही त्यापैकी काही लोकांपर्यंत मी स्वतः पोचून त्यांचे मार्गदर्शन घेणार आहे, जेणेकरून आपल्याला आपला महान देश एकत्र आणता येईल. मी सुरवातीपासून म्हणत आहे की, आमचा हा प्रचार नाही, तर एक अतुलनीय चळवळ आहे. देशावर प्रेम करणाऱ्या लाखो कष्टकरी स्त्री-पुरुषांना आपल्या सर्वांचे उज्ज्वल भविष्य हवे आहे. त्यांची ही चळवळ आहे. 

आपल्या सरकारने लोकांची सेवा करावी असे ज्यांना वाटते अशा सर्व विविध वंश, धर्म, श्रद्धा असलेल्या अमेरिकन नागरिकांची ही एक चळवळ आहे, आणि आपले सरकार त्यांची सेवा करेल. एकत्रित येऊन आम्ही तत्परतेने आपल्या राष्ट्राची पुन्हा उभारणी करण्यासाठी आणि अमेरिकन स्वप्न पुनरुज्जीवित करण्यासाठी एक काम हाती घेणार आहोत. 
जगभरातील विविध प्रकल्प आणि व्यक्तींमधील उपयोगात न आलेल्या सुप्त शक्तींवर लक्ष ठेवतच मी माझे संपूर्ण आयुष्य व्यवसायात व्यतित केले आहे. आता हेच काम मला आपल्या देशासाठी करायचं आहे. इथे प्रचंड सुप्त शक्ती आहे. आपला देश मला चांगला माहीत झाला आहे. प्रचंड सुप्त शक्ती आहे. ही एक सुंदर बाब आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला त्याची संपूर्ण सुप्त शक्ती उपयोगात आणण्याची संधी मिळेल. आपल्या देशातील विस्मृतीत गेलेले स्त्री-पुरुष यापुढे विस्मरणात जाणार नाहीत. 

आम्ही शहरांचे अंतर्गत नियोजन करणार आहोत. महामार्ग, पूल, बोगदे, विमानतळे, शाळा, रुग्णालयांची पुनर्बांधणी करणार आहोत. आपल्या पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी केली जाईल. त्या सुविधा कशातही कमी नसतील. लाखो लोकांना काम देऊन या पुनर्बांधणीत सहभागी करू घेऊ. तसेच, आपल्यातील जे एकनिष्ठ राहिले आहेत त्या महान समर्थकांचीही काळजी आम्ही घेऊ. या अठरा महिन्यांच्या काळात मला अशा अनेक एकनिष्ठ व्यक्ती भेटल्या. प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत घालविलेला वेळ माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. आमचे समर्थक हे अतुलनीय लोक आहेत. 

आम्ही राष्ट्राची प्रगती आणि नूतनीकरणाची एक मोहीम हाती घेणार आहोत. लोकांमधील सर्जनशीलता एकत्र आणू आणि सर्वांच्या लाभासाठी त्यांच्यातील प्रचंड प्रतिभेला वाव देण्यासाठी जे जे सर्वोत्कृष्ट असेल ते करू आणि हे घडणार आहे. आमच्याकडे एक मोठा आर्थिक आराखडा आहे. आम्ही आपला विकास दुप्पट करू आणि जगातील कुठेही नसेल अशी सामर्थ्यशाली अर्थव्यवस्था बनवू. त्याचबरोबर, आपल्यासोबत राहू इच्छित असलेल्या इतर देशांना आम्ही सोबत घेऊ. त्यांच्याशी आपले उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संबंध राहतील. अत्यंत उत्कृष्ट संबंध आम्ही निर्माण करू. कोणतेही स्वप्न अशक्‍य नाही. कोणतेही आव्हान खूप मोठे नसते. आपल्याला भविष्यासाठी हवे असलेली कोणतीही गोष्ट आमच्या आवाक्‍याबाहेर नाही. 

जे सर्वोत्कृष्ट आहे ते मिळविल्याशिवाय अमेरिका स्वस्थ बसणार नाही. आपण आपल्या देशाचे नशीब अजमावले पाहिजे. मोठी, साहसी आणि धाडसी स्वप्नं पाहिली पाहिजेत. आपल्या ते करायचं आहे. आपल्या देशासाठी अनके गोष्टींची स्वप्नं पाहायची आहेत. त्या सुंदर गोष्टी आणि यशस्वी गोष्टी पुन्हा घडविण्यासाठी. 
जागतिक समुदायाला मी सांगू इच्छितो की, आम्ही अमेरिकेच्या हिताला सदैव प्राधान्य देऊ, मात्र अगदी प्रत्येकाशी योग्य व्यवहार करू. सर्व लोक आणि इतर सर्व देशांसोबत आम्ही वैमनस्य, भागीदारी किंवा संघर्ष नव्हे, तर सामाईक दुवा शोधू... आणि आता या ठिकाणी, हा ऐतिहासिक विजय मिळविण्यात खरोखर ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानू इच्छितो. 

प्रथम मी माझ्या पालकांना धन्यवाद देऊ इच्छितो. मला माहीत आहे की, ते आता आभाळातून माझ्याकडे पाहत आहेत. त्या महान पालकांकडून मी खूप काही शिकलोय. प्रत्येक बाबतीत ते अतिशय विस्मयकारक होते. ते खरोखर महान पालक आहेत. माझ्यासोबत आता येथे आहेत त्या मरियान आणि एलिझाबेथ या माझ्या बहिणींना मी धन्यवाद देऊ इच्छितो. (श्रोत्यांमध्ये पाहत) कुठे आहेत त्या? त्या काहीशा लाजऱ्या आहेत. इथेच कुठेतरी आहेत.. आणि माझा भाऊ रॉबर्ट, माझा महान मित्र. रॉबर्ट कुठे आहे? खरं तर ते व्यासपीठावर असायला हवेत, पण ठीक आहे. ते महान आहेत. माझे दिवंगत बंधू फ्रेड हा एक अतिशय चांगला माणूस. विलक्षण माणूस. विलक्षण कुटुंब. मी खूप नशीबवान आहे. 
महान भाऊ, बहिणी, आणि महान, अतुलनीय असे पालक. तसेच, मेलानिया आणि डॉन, इव्हांका आणि एरिक, टिफनी आणि बॅरन, आय लव्ह यू आणि विशेषत: तुमचा वेळ दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमच्याशिवाय हे कठीण होते. 
(अनुवाद : संग्राम शिवाजी जगताप

Web Title: we will rebuild america- donald trump's full victory speech