Weird Tradition Viral News : आजही या मुलींना द्यावा लागतो व्हर्जिनीटीचा पुरावा, आईच मुलीचे कपडे...

वयाच्या २१ व्या वर्षी करतात व्हर्जिनीटी पार्टी.
Wierd Tradition Viral News
Wierd Tradition Viral News esakal
Updated on

South Africa Wierd Tradition : प्रत्येक देशाच्या पद्धती, चालीरिती वेगवेगळ्या असतात. काही परंपरा फारच विचित्र असतात. काही परंपरा कालबाह्य झालेल्या असतात. पण ठिकाणी त्या आजही जपल्या जात आहेत. अशाच काही विचित्र परंपरांपैकी एक असलेली ही परंपरा आहे ज्याने जगाचे लक्ष वेधले आहे.

आफ्रिकेतल्या झुलू जमातीत उमेमुलो नावाची वेगळी परंपरा आहे. या परंपरेनुसार मुलीला तिचं कौमार्य म्हणजे व्हर्जिनीटी सिद्ध करावी लागते. आणि यासाठी तिचे कुटुंबिय मोठ्या सोहळ्याचे आयोजन करतात.

Wierd Tradition Viral News
Wierd Tradition Viral News esakal

महिलांचा विरोध

दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू जमातीत लग्नापूर्वी सेक्स करणं अपवित्र मानलं जातं. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत मुलीने व्हर्जीन राहणे अनिवार्य आहे. मात्र आता महिलांचे विचार बदलत आहेत. अनेक महिला या प्रकाराला असामनतेचं प्रतिक मानतात. तिथे पुरुषांसाठी अशी कोणतीही प्रथा नाही. त्यामुळे महिला, पुरुषांना नियम समान असावे असा विचार मांडला जात आहे.

Wierd Tradition Viral News
Divorce Temple Viral News : जगातलं सगळ्यात अनोखं 600 वर्ष जूनं मंदिर, महिलांशी आहे खास संबंध
Wierd Tradition Viral News
Wierd Tradition Viral News esakal

व्हर्जिनीटी पार्टी

या जमातीतली मुलगी जेव्हा २१ वर्षांची होते तेव्हा तिचे कुटुंबिय या पार्टीचे आयोजन करतात. यावेळी मुलीची व्हर्जिनीटी सेलिब्रेट केली जाते. या उमेमुलो परंपरेत मुलीने लग्नापूर्वी सेक्स न केल्याबद्दल आणि संस्कारांचं पाल केल्याबद्दल तिचा सन्मान केला जातो. तिचे पालक आमची मुलगी २१ वर्षांची झाली असून अद्याप कुमारिका आहे असं तिचे पालक अभिमानाने सांगत हा आनंदोत्सव साजरा करतात.

याव्ळी मुलीला खूप गिफ्ट्स दिले जातात. मुलीचे कुटुंबिय या पार्टीसाठी नातेवाईकांना निमंत्रीत करतात. पार्टी सुरू होण्याआधी मुलीच्या सन्मानार्थ प्राण्याचा बळी दिला जातो. या प्राण्याची कातडी सोलून त्याने मुलीला आपलं शरीर झाकून घ्यावं लागतं.

Wierd Tradition Viral News
Society Rules Viral News : सोसायटीचा अजब नियम, नो लुंगी, नो नायटी.., आता रहिवाशांना ड्रेस कोड!

व्हॉइस इंडियातल्या एका लेखात थेंबला या झुलू जमातीच्या महिलेने लिहिलं आहे की, तिला या परंपरेतून जावं लागलं आहे. ती २१ वर्षांची होण्याच्या ६ महिने आधीच तिच्या कुटुंबियांनी या व्हर्जिनीटी पार्टीची तयारी सुरू केली होती. मी व्हर्जिन आहे की, नाही हे आईने तपासलं. कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेनुसार तिला टॉपलेस व्हायचं होतं. गायीचे फॅटी टिश्यू अंगावर घालायचे. या समारंभादरम्यान हे टिश्यू फाटले तर या अर्थ संबंधित मुलगी व्हर्जिनीटीबाबत खोटं बोलत आहे, असं मानलं जातं.

पण हा प्रकार असमानता दर्शवणारा असल्याने याला विरोध होत असून, महिला व पुरुषांसाठी समान नियम असावे अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.