'वेट फूट, ड्राय फूट' धोरण बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : क्‍यूबामधून अमेरिकेमध्ये स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना एका वर्षानंतरच नागरिकत्व देण्याचे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले अमेरिकेचे धोरण अध्यक्ष बराक ओबामा यांनी थांबविले आहे.

अमेरिकेमध्ये "वेट फूट, ड्राय फूट' या नावाने हे धोरण राबविले जात होते. हे धोरण संपुष्टात आणून क्‍यूबाबरोबरील संबंध अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बराक ओबामा यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. "वीस वर्षांपूर्वी एका वेगळ्या परिस्थितीमध्ये हे धोरण सुरू केले होते.

क्‍यूबाबरोबरील संबंध सुरळीत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असून स्थलांतरितांच्या धोरणामध्येही सातत्य आणले जाणार आहे. आधीच्या धोरणानुसार, क्‍यूबामधून अमेरिकेमध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना एक वर्ष अमेरिकेमध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र इतर स्थलांतरितांप्रमाणेच बेकायदा प्रवेश असल्यास त्यांना तातडीने माघारी पाठविले जाणार आहे. क्‍यूबानेही परत पाठविलेल्या नागरिकांना परत घेण्याचे मान्य केले आहे.

Web Title: wet foot, dry foot policy ceased