भारताची निर्यातबंदी; जगभरात गव्हाच्या किंमती पोहोचल्या शिगेला

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान या दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन कमी झाल्याचे संयुक्त राष्ट्राने सांगितलं आहे.
Wheat
Wheat sakal

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या नंतर विदेशात अन्नाचा तुटवडा भासू लागला आहे. सर्वजण आपापली भूक भागवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशात तुलनेने गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच भारताने गव्हाची निर्यात थांबवल्यामुळे जगभरातील गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत.

(Wheat Prices Jumps Worldwide After India Stop Exporting)

संयुक्त राष्ट्राची फुड एजन्सी 'अन्न आणि कृषी संघटना'ने (FAO) एक अहवाल सादर केला आहे. त्यांच्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन कमी झाले. मे महिन्यात गव्हाच्या जागतिक किंमतीत ५.६ टक्क्याने वाढ झाल्याचे FAO ने सांगतिलं आहे. मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या किंमती ५६.२ टक्क्यानी वाढल्या आहेत असं अहवालात म्हटलं आहे.

Wheat
अमृता फडणवीसांकडून ट्विटरवर लाईक मिळवण्यासाठी हे करा...

या कारणामुळे वाढले गव्हाचे जागतिक भाव

संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने सांगितलेल्या माहितीनुसार हल्ल्यामुळे युक्रेनमधील गव्हाचं उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गव्हाची निर्यात करणाऱ्या देशातील खराब वातावरणामुळे तेथील उत्पादनात घट झाली आहे. यादरम्यान भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती वाढत आहेत. त्याबरोबर तांदुळाच्या भावातही वारंवार वाढ होत आहेत असा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने सादर केला आहे.

दरम्यान इतर धान्यांच्या किंमती मे महिन्यात त्यामानाने कमी झाल्या आहेत परंतु गव्हाच्या किंमती वारंवार वाढत आहेत. त्याचबरोबर तयार अन्नाच्या किंमती सध्या काहीशा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय असं FAO च्या अहवालात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com