

US Cuba Relations
ESakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे संकेत दिले आहेत की, व्हेनेझुएला आणि इराणनंतर क्युबा अमेरिकेसाठी एक धोरणात्मक प्राधान्याचा देश बनू शकतो. व्हेनेझुएलाप्रमाणेच क्युबामध्ये भविष्यात होणाऱ्या अमेरिकी कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-क्युबा संबंध आणि लॅटिन अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या धोरणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.