White House Shooting : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, दोन जवान जखमी; एक संशयित ताब्यात

Washington DC shooting : व्हाईट हाऊसपासून काही रस्त्यांवर गोळीबाराची घटना घडली.गोळीबारात किमान तीन जण जखमी झाले, त्यात दोन नॅशनल गार्ड जवानांचे समावेश आहे. घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता झाली.
Heavy police and National Guard deployment near the White House after a shooting incident in Washington DC.

Heavy police and National Guard deployment near the White House after a shooting incident in Washington DC.

esakal

Updated on

Summary

  1. जखमी जवानांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  2. एक संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.

  3. घटनेनंतर संपूर्ण परिसर पोलिसांनी सील करून कडेकोट बंदोबस्त तैनात केला.

जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानापासूनच काही अंतरावर गोळीबार झाला. वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसपासून काही रस्त्यांवरच ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात किमान तीन जण जखमी झाले आहेत, ज्यात दोन नॅशनल गार्ड्सच्या जवानांचा समावेश आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता घडली. जखमी झालेल्या दोन्ही नॅशनल गार्ड जवानांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com