अभिमानास्पद! भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनच्या प्रमुखपदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 December 2020

भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ अनिल सोनी यांची जागतिक आरोग्य संघटन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे

नवी दिल्ली- भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ अनिल सोनी यांची जागतिक आरोग्य संघटन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य मोर्च्यावर लढाईसाठी एक नवी संघटना बनवली आहे. अनिल सोनी यांना या संघटनेची धुरा देण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा मान देण्यात आल्याने अभिमानाची बाब आहे. 

अनिल सोनी 1 जानेवारीपासून आपली जबाबदारी सांभाळतील. यादरम्यान त्यांचे मुख्य फोकस जगातील आरोग्य क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणणे आणि याचा फायदा सर्वसाधारण लोकांना पोहोचवण्यावर असणार आहे. 

''भारतीय लोकांच्या शोषणाचे सर्वात मोठे उदाहरण, पेट्रोल 90 च्या पार...

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संकटादरम्यान मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटन फाऊंडेशनची सुरुवात केली होती. आतापर्यंत अनिल सोनी ग्लोबल हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत जोडले गेले होते, याठिकाणी त्यांनी ग्लोबल इंफेक्शन डिसीजचे प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांनी अनिल सोनी यांचे कौतुक केले. ते आरोग्य क्षेत्रात नवे प्रयोग करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. टेड्रोस म्हणाले की सध्या जग एका कठीण काळातून जात आहे. अशावेळी अनिल सोनी यांचा दृष्टीकोन आपल्याला आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी मदत करेल, असं ते म्हणाले आहेत. 

अनिल सोनी यांनी याआधी क्लिंटन हेल्थ एक्सेसमध्ये काम केले आहे. तेथे ते 2005 ते 2010 पर्यंत होते. याशिवाय त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे. अनिल सोनी यांनी एचआयव्हीच्या उपचारामध्येही महत्वाची भूमिका बजावली आहे. 

2020 मध्ये जगावर कोरोना नावाचं भयंकर संकट ओढावलं. यादरम्यान कोरोना महामारीविरोधात लढण्यात आरोग्य संघटना कमी पडल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण, आता नवे संघटन आणि नव्या उत्साहाने WHO नवीन काही करु पाहात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The WHO Foundation has appointed anil soni as its inaugural CEO