पिया डांडिया कोण? भारतीय वंशाच्या उमेदवाराचा अमेरिकेत डंका, मध्यावधी निवडणुकीत विजयी

Who Is Pia Dandiya अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. फ्लोरिडातील एका मतदारसंघात भारतीय वंशाच्या पिया डांडिया यांनी विजय मिळवला आहे.
US Midterms 2026: Pia Dandiya Wins Florida District 22

US Midterms 2026: Pia Dandiya Wins Florida District 22

Esakal

Updated on: 

अमेरिकेच मध्यावधी निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भारतीयवंशाच्या उमेदवारांनीही बाजी मारली आहे. भारतीय वंशांच्या उमेदवार पिया डांडिया यांनी फ्लोरिडातील एका मतदारसंघात विजय मिळवलाय. त्या डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात होत्या. पिया डांडिया यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी सैनिक कैसी अस्कर यांचा पराभव केला. या मतदारसंघात विजयी होण्याचं आव्हान डेमोक्रॅटिक पक्षासमोर होतं.

Loading content, please wait...