Susie WilesESakal
ग्लोबल
निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती
Who is Susie Wills: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुझी विल्स यांची व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष जेडी वन्स यांनी याला दुजोरा दिला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील नेत्याचे हे सर्वात मोठे राजकीय पुनरागमन मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना चुरशीच्या लढतीत पराभूत करण्यात यश मिळविले आहे. ज्या महिलेने ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्यात सर्वात जास्त योगदान दिले आहे. आता ट्रम्प यांनी त्यांना पहिले बक्षीस दिले आहे.

