डब्लूएचओची धक्कादायक माहिती; हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमूळे कोरोना बाधित रुग्णाचा होऊ शकतो मृत्यू

यूएनआय
मंगळवार, 26 मे 2020

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने जगभरात सर्व देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगातील बहुतेक देश हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर करत आहेत. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधावर बंदी घातली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच देशांमध्ये सध्या संशोधन सुरु आहे. मात्र, अद्याप पर्यंत यामध्ये यश मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कोरोनाचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढतच असल्याचे चित्र आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संक्रमणाने जगभरात सर्व देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगातील बहुतेक देश हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर करत आहेत. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधावर बंदी घातली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच देशांमध्ये सध्या संशोधन सुरु आहे. मात्र, अद्याप पर्यंत यामध्ये यश मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कोरोनाचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढतच असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

चीनच्या वुहान शहरातून सर्व जगभर संक्रमण झालेल्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देश आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढत उपद्रव लक्षात घेता यावर औषधाचे संशोधन करण्याचा प्रयत्न सर्वच देश युद्ध पातळीवर करत आहेत. मात्र सद्य स्थितीत तरी यावर कोणतेही रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे जगातील बहुतेककरून सर्व देश हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर करत आहेत. आता मात्र कोरोनावर तात्पुरता उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन किंवा क्लोरोक्विनवर जागतिक आरोग्य संघटनेने  बंदी घातली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची क्लिनिकल चाचणी खबरदारी म्हणून बंद केली असल्याचे सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालावरून हा निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.   

डोनाल्ड ट्रम्प यांनी एचसीक्‍यूचा कोर्स पूर्ण केला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लंडनमधील लॅन्सेट या वैज्ञानिक साप्ताहिकाने प्रयोग करत कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अथवा क्लोरोक्विन हे औषध अधिकच घातक असल्याचे म्हटले होते. लॅन्सेट या साप्ताहिकाने यासाठी जगभरातील साडे सहाशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालाचा अभ्यास करून हा निष्कर्ष तयार केला होता. या निष्कर्षानुसार कोरोना बाधित रुग्णांना  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अथवा क्लोरोक्विन दिलेल्या रुग्णांची स्थिती अधिकच खालावत जाऊन हृदयविकाराचा त्रास बळावल्याचे म्हटले आहे. 

जगात कुठे, काय सुरु?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मुळात मलेरिया वरील औषध आहे. वैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टर यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना विषाणूवर उपयुक्त नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते. त्यानंतर काही देशांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर थांबविला होता. तसेच अमेरिकेतील वैद्यकीय तज्ञ तसेच डॉक्टर यांच्याकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर करोना बाधित रुग्णांनी सल्ल्यानुसारच करावा असे सांगण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO pauses hydroxychloroquine study due to safety concerns