मंकीपॉक्स कोरोनासारखा हाहाकार माजवणार?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत | Pandemic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox

मंकीपॉक्स कोरोनासारखा हाहाकार माजवणार?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

जागतिक स्तरावर कोरोना (Corona) महामारीने त्रस्त लोकांच्या मनात आता मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजाराची भीती वाढू लागली आहे. आतापर्यंत या आजाराची कॅनडा, स्पेन, इस्रायल, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह डझनभर देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेल्याची पुष्टी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (WHO) करण्यात आली आहे. दरम्यान, दिवसागणिक वाढत चाललेल्या मंकीपॉक्सच्या रूग्णांच्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात हा आजार पुढे साथीचे रूप घेईल का? असे प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली असून, यावर तज्ज्ञांचे नेमकं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. (Expert Comment On MonkeyPox)

हेही वाचा: मंकीपॉक्स: वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्राचे महत्त्वाचे आदेश

कोरोनासारखी परिस्थिती राहणार नाही

मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे चिंताजनक आहेत, परंतु या आजाराची स्थिती कोविड सारखी महामारी बनण्याचा धोका शून्य टक्के असल्याचे मत युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड अप्पर चेसापीक हेल्थचे डॉ. फहीम युनूस यांनी सांगितले. ते म्हणाले की, SARS-CoV-2 सारखा मंकीपॉक्स विषाणू नवीन नाही. एवढेच नव्हे तर, जगाला मंकीपॉक्सबद्दल अनेक दशकांपासून माहिती आहे आणि या आजाराची चांगली समज असून, मंकीपॉक्सचा विषाणू सहसा प्राणघातक नसून हा विषाणू कोरोनाव्हायरसपेक्षा कमी संसर्गजन्य आहे.

डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे माजी प्रमुख डॉ. डेव्हिड हेमन यांनी सांगितले की, मंकीपॉक्स हा सेक्सद्वारे मानवांमध्ये अधिक पसरत आहे आणि त्यामुळे जगभरात त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्याचा धोका समलिंगी लोकांमध्ये अधिक सांगितला जात आहे. दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण होते असेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

हेही वाचा: फ्रान्स, बेल्जियम, जर्मनीत मंकीपॉक्सचा कहर; नागरिकांची चिंता वाढली

कोरोनासारखी भयंकर परिस्थिती नसेल - बायडेन

दरम्यान, सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना अमेरिकेकडे मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी लसीचा पुरेसा साठा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मंकीपॉक्समुळे कोरोनासारखी परिस्थिती उद्भवणार नाही. मंकीपॉक्सची पातळी कोरोनाइतकी भयानक असेल असे मला वाटत नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडे या समस्येला सामोरे जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा आहे. (Joe Biden On Monkeypox)

Web Title: Who Recorded More Than 90 Cases Of Monkeypox In Dozen Countries

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top