WHOचा रिसर्च रिपोर्ट झाला लीक; कोरोना पसरण्यामागचं उलगडलं रहस्य

Corona WHO
Corona WHO

बीजिंग : कोरोना व्हायरसच्या उत्पत्ती संदर्भातील संशोधन जागतिक आरोग्य संघटनेकडून केलं जात आहे. WHO ची एक टीम सध्या चीनमध्ये यासंदर्भात अभ्यासदौऱ्यावर आहे. त्यांच्या या अभ्यासदौऱ्यातील संशोधनाचा एक अहवाल लीक झाला आहे. WHO च्या या अहवालात म्हटलं गेलंय की, वटवाघळापासून कोरोना व्हायरस इतर एखाद्या जनावरामध्ये गेला आणि तिथून तो माणसांमध्ये पसरला असल्याची शक्यता सर्वाधिक आहे. 

अनेक प्रश्न अनुत्तरितच
कोरोनाच्या उत्पत्तीवर WHO च्या या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधून पसरला असण्याच्या शक्यता  फारच कमी आहेत. असोसिएटेड प्रेसच्या हाती लागलेल्या या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. WHO च्या या अहवालात अपेक्षित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीयेत. WHO च्या या टीमने प्रयोगशाळेतून व्हायरस पसरल्याचा मुद्दा सोडून इतर सर्व मुद्यांवर अधिक संशोधन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

अहवालास होतोय सातत्याने विलंब
या अभ्यासाच्या निष्कर्षाचा अहवाल जाहीर होण्यामध्ये सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे असे प्रश्न निर्माण होत आहेत की चीन या अहवालावर स्वत:चा प्रभाव तर टाकत नाहीये ना जेणेकरुन कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा दोष आपल्या माथ्यावर येऊ नये, अशी आशंका व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्याच्या शेवटी म्हटलं होतं की, त्यांना आशा आहे की, या टीमचा संशोधन अहवाल येत्या काही दिवसांतच सार्वजनिक केला जाईल. 

व्हायरसचे चार मुख्य कारण
संशोधकांनी SARS-CoV-2 व्हायरसच्या उत्पत्तीसाठी चार प्रमुख कारणांची नोंद केली आहे. यातील एक कारण आहे जनावराच्या माध्यमातून दुसऱ्या जनावरामध्ये संक्रमण पसरण्याची प्रमुख शक्यता. वटवाघळामधून थेट माणसाच्या शरिरात संक्रमण पसरण्याची शक्यता नाहीये. या अहवालात म्हटलं गेलंय की, 'कोल्ड-चेन' खाद्य उत्पादनांच्या माध्यमातून संक्रमण पसरण्याची शक्यता आहे मात्र ती फारच दुर्मिळ आहे. 

WHO चं काय आहे म्हणणं?
याशिवाय या संशोधनात असं देखील समजलं आहे की, मिंक आणि मांजरे देखील कोरोनाच्या व्हायरससंदर्भात अतिसंवेदनशील आहेत. याचा अर्थ ते कोरोना व्हायरसचे वाहक ठरू शकतात. या वुहान मिशनचं नेतृत्व करणारे WHO च्या टीमचे तज्ज्ञ पीटर बेन एम्बरेक यांनी म्हटलं की रिपोर्टला अंतिम रुप दिलं गेलं आहे आणि यातील मांडलेल्या तथ्यांची पुर्नतपासणी सुरु आहे. त्यांनी म्हटलं की, मला आशा आहे की, येत्या काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्ही या अहवालाला सार्वजनिक रित्या जाहीर करु. 

सीफूड बाजारातून पसरला व्हायरस?
आतापर्यंत WHO च्या टीमला ही गोष्ट समजली नाहीये की सुरवातीच्या काळात डिसेंबर 2019 मध्ये हा व्हायरस वुहानमधील एका सीफूड बाजारात सापडला होता की नाही? या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की, व्हायरसची सुरवात सीफूड बाजारातून झालीय की नाही याबाबत काही ठोस निष्कर्ष निघाला नाहीये. हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्याआधी WHO च्या या टीमला अद्याप बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com