esakal | युक्रेनमध्ये महिला जवानांची बुटं का ठरलीयत वादग्रस्त?
sakal

बोलून बातमी शोधा

युक्रेनमध्ये महिला जवानांची बुटं का ठरलीयत वादग्रस्त?

युक्रेनमध्ये महिला जवानांची बुटं का ठरलीयत वादग्रस्त?

sakal_logo
By
विनायक होगाडे

किव्ह : ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लष्करातील महिला जवानांकडून उंच टाचांचे बूट घालून संचलन करण्याचा सराव करून घेतला जात असल्यावरून युक्रेनमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या बूटांमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी टीका विविध संघटनांकडून, तसेच संसद सदस्यांकडूनही होत आहे. संरक्षण मंत्रालयाने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

हेही वाचा: केंद्रीय संस्थाचा वापर करुन विरोधकांंचं दबावतंत्र - उद्धव ठाकरे

सोविएत महासंघापासून युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेला २४ ऑगस्टला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त होणाऱ्या संचलनात महिला जवानांची तुकडी उंच टाचांचे बूट घालून संचलन करणार आहे. त्यासाठी त्यांचा दिवसातून दोन वेळेस सरावही करून घेतला जात आहे. असे बूट घालून संचलन करणे सुरुवातील अवघड जात असले तरी प्रयत्नांनंतर ते शक्य होईल, असे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, अनेक माध्यमांनी आणि संसद सदस्यांनी निर्णयाला विरोध केला आहे. महिलांच्या आरोग्यावर यामुळे परिणाम होणार असल्याचे निर्णयाच्या विरोध करणाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा!

संरक्षण मंत्रालयाने मात्र निर्णयाचे समर्थन करताना इतर देशांमधील महिला जवान उंच टाचांचे बूट घालत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, या देशांमधील महिला जवान असे बूट संचलनासाठी वापरत नाहीत, असे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले आहे. विरोध वाढल्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने, नवीन आणि चांगल्या दर्जाचे बूट मागविण्याचे आदेश दिले जातील, असे जाहीर केले. युक्रेनच्या लष्करात ५७ हजार महिला आहेत.

loading image