esakal | बलुचिस्तान पाकिस्तानची डोकेदुखी का ठरला आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

baluchistan.jpg

पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र होऊन ७३ वर्ष झाल्यानंतरही तेथील बलुचिस्तान हा प्रांत तणावग्रस्त राहिला आहे

बलुचिस्तान पाकिस्तानची डोकेदुखी का ठरला आहे?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र होऊन ७३ वर्ष झाल्यानंतरही तेथील बलुचिस्तान हा प्रांत तणावग्रस्त राहिला आहे. जागतिक पटलावर बलुचिस्तानचा उल्लेख झाला की  हिंसा, मानवाधिकार उल्लंघन, द्रोह अशाच गोष्टी निदर्शनास येतात. बलुचिस्तानमध्ये कधी हिंसा उफाळून येईल हे सांगता येत नाही. बलुचिस्तान इतका अशांत का आहे, हे आपण जाणून घेवूया...

पाकिस्तान-चीनमध्ये गुप्त करार!; जैविक युद्धासाठी दोन्ही देशांची तयारी?
बलुचिस्तानच्या अस्वस्थतेची सुरुवात खरेतर १९४८ पासून झाली. बलुचिस्तानला पाकिस्तानचा एक भाग करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर होतं. ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा बलुचिस्तानने आपलं स्वातंत्र्य घोषीत केलं. विशेष म्हणजे कायदे आझम मोहमद अली जिन्हा यांनी बलुचिस्तानचं स्वातंत्र्य मान्य केलं होतं. यासंदर्भातल्या करारावर त्यांनी आपलं हस्ताक्षर केलं होतं. मात्र, यानंतर ते आपल्या शब्दांपासून फिरले. त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये सामिल होण्यास सांगितलं. त्यावेळी बलुचिस्तानच्या संददेने नकार दिला. पण १९४८ साली लष्कर पाठवून बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये सामावून घेण्यात आलं.

आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून बलुचिस्तान पाकिस्तानमधील मोठा प्रांत असून देखील सर्वाधिक मागास आहे. स्वातंत्र्यापासून बलुचिस्तानची सकल राष्ट्रीय उत्पन्नातील भागिदारी कमी होत गेली आहे.  बलुच लोकांची संख्याही कमी होत गेली आहे. आता येथे मोठ्या प्रमाणात पश्तून, सिंधी आणि पंजाबी लोक येऊन राहू लागले आहेत. बलूच लोकांचा पाकिस्तानच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप कमी वावर आहे. बलुचिस्तानमध्ये खूप कमी पाऊस पडतो. मात्र, येथे हायड्रो कार्बन वायू मोठ्या प्रमाणात आहे. पाकिस्तान बलुचिस्तानमधून खनिज संपत्तीचा मोठ्या प्रमाणात उपसा करत आला आहे. मात्र, याचा काहीही फायदा बलूच प्रांताला झालेला नाही. बलुचिस्तानला ७६० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रांताचे सामरिक महत्व मोठे आहे. 

चीन लडाखमधून सर्व सैन्य मागे घेण्यास सहमत- भारत सरकार
बलूच आंदोलनाला पाकिस्तानने नेहमीच लष्कराच्या साहाय्याने दडपले आहे. १९५९ मध्ये बलूच नेता नोरोज खान यांनी पाकिस्तान सरकारसोबतच्या करारान्वे शस्त्र खाली ठेवले होते. मात्र, ८० वर्षीय नोरोज यांनी शस्त्र खाली ठेवताच पाकिस्तान सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना फाशी दिली होती. १९७४ मध्ये पाकिस्तानी सरकारने लष्करी हेलिकॉप्टर पाठवून बलूच भागात बॉम्ब टाकून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. २००६ मध्ये परवेज मुशरफ यांच्या शासन काळात बलूच आंदोलनाचे नेता नवाब अख्तर भुक्ती यांना पाकिस्तान सैन्याने त्यांच्या गुफेमध्ये जाऊन मारलं होतं. भुक्ती बलूच आंदोलनातले मोठे नाव होते. त्यांनी पाकिस्तान सरकारमध्ये केंद्रीय मंत्री पद भूषवलं होतं.

बलूच आंदोलनातील लोकांचे अपहरण करणे, त्यांची हत्या करण्याचे काम पाकिस्तान लष्कर मोठ्या प्रमाणात करत आले आहे. अनेक बलूच नेत्यांना गायब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन पहिल्यांदा बलुचिस्तानचा उल्लेख केला. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष बलुचिस्तानकडे वळले. बलुची लोकांनी मोदींच्या कृतीचे स्वागत केले होते. मात्र, पाकिस्तानने यावर टीका करत भारत सरकार बलुची लोकांना मदत करत असल्याचा आरोप केला होता. 

बलुची लोकांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी तीव्र आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये बलूच लोकसंख्या खूप कमी आहे. शिवाय बलुचिस्तानमध्ये पश्तून लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बलुची लोक अनेक गटामध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांचा एक म्हणून असा मोठा नेता नाही. बलुची नेत्यांनी ब्रिटन, स्वित्झलँड, यूएईमध्ये शरण घेतलं आहे. अशावेळी त्यांना एकत्र घेऊन मोठे आंदोलन उभे करणे कठीण आहे.