स्वस्तात मस्त असलेले Redmi चे टॉप 5 स्मार्टफोन्स, पाहा यादी | Redmi Smartphones | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affordable Redmi top 5 phone in lowest price see list

स्वस्तात मस्त असलेले Redmi चे टॉप 5 स्मार्टफोन्स, पाहा यादी

जर तुम्ही नवा Redmi स्मार्टफोन्स घण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या बजेट रेंजमध्ये फोन शोधत असाल तर आज तुम्हाला अनेक दर्जेदार स्मार्टफोन्स बद्दल माहिती देणार आहोत. या रेडमी फोन्समध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीत अनेक उत्तम फीचर्स मिळतात. हे सर्व स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध आहेत. आपण टॉप ५ रेडमी स्मार्टफोन्सची माहिती घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी कॅमेरा आणि डिस्प्ले देखील मिळतो. ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

Redmi Note 8 Pro

या Redmi स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Helio G90T चा गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. जे तुम्हाला सर्वोत्तम गेमिंग एक्सपिरीयंस देते. चांगल्या फोटोंसाठी, या Redmi फोनमध्ये 64MP क्वाड रियर कॅमेरा सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्हाला हेवी बॅटरी असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल. तर यामध्ये तुम्हाला 4500mAH ची बॅटरी दिली जात आहे.

Redmi Note 10 Pro

हा Redmi स्मार्टफोन फुलएचडी + डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात 64MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सोबतच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G सह Kryo 470 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. जे तुम्हाला लॅग फ्री परफॉर्मन्स देते. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5020mAH बॅटरी आणि 33W फास्ट चार्जर देण्यात आले आहे.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

Redmi Note 10 Pro Max

या Redmi स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जात आहे. या रेडमी फोनमध्ये सर्वात कमी किमतीत 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चांगले हाय क्वालिटी फोटो यामध्ये क्लिक करू शकतात. हेवी वर्क सुरळीत करण्यासाठी, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G सह क्रियो 470 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Redmi Xiaomi Note 7 Pro

तुम्हाला वैयक्तिक आणि मनोरंजनासाठी स्मार्टफोन घ्यायचा असल्यास हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला अनेक आकर्षक रंगांचे पर्याय देखील देण्यात आले आहेत. त्याची रचना देखील अतिशय स्लिम आणि हलकी आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 64GB चे इंटरनल स्टोरेज मिळते.

हेही वाचा: लवकरच येतोय OnePlus फोनचा स्पेशल व्हेरियंट; वाचा किंमत-फीचर्स

Redmi Note 10

या स्मार्टफोनला 5000mAh हेवी बॅटरी दिली जात आहे. या रेडमी फोनमध्ये सर्वात कमी किमतीत तुम्हाला 6.43-इंचाचा फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 48MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. कमी बजेटमध्ये हा खूप चांगला स्मार्टफोन ठरु शकतो.

loading image
go to top