esakal | वन्यजीव व्यापारामुळे जैवविविधता धोक्यात

बोलून बातमी शोधा

Wild-Animal}

आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यापारामुळे पृथ्वीवरील वनस्पती व प्राण्यांच्या तब्बल ६० टक्के प्रजातींवर विपरित परिणाम झाला असून त्यांची संख्या घटत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एक जागतिक संशोधनातून काढण्यात आला आहे.

global
वन्यजीव व्यापारामुळे जैवविविधता धोक्यात
sakal_logo
By
पीटीआय

पृथ्वीवरील ६० टक्के प्रजातींवर परिणाम; इंग्लंडमधील संशोधन 
लंडन - आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यापारामुळे पृथ्वीवरील वनस्पती व प्राण्यांच्या तब्बल ६० टक्के प्रजातींवर विपरित परिणाम झाला असून त्यांची संख्या घटत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एक जागतिक संशोधनातून काढण्यात आला आहे. यासंदर्भात आणखी सखोल संशोधन करण्याची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर इकॉलॉजी ॲंड इव्होल्युशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वन्यजीव व्यापारामुळे जगातील सुमारे ६२ टक्के प्रजातींच्या विपुलतेवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ८० टक्क्यांहून अधिक प्रजातींचेही नुकसान होत आहे. या व्यापाराचे व्यवस्थापन करण्यासाठी धोरणे आखली आहेत. मात्र, वन्यजीवांवरील पुरेसा परिणाम लक्षात न घेता आखलेल्या या धोरणांमुळे या प्रजातींचे रक्षण होऊ शकत नाही, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. वन्यजीवांच्या व्यापारांमुळे आफ्रिकी हत्तींवर कुऱ्हाड कोसळली आहे. हस्तीदंतांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याने या हत्तींची संख्या घटत आहे. त्याचप्रमाणे, आशिया व आफ्रिकेतील खवले मांजरांची संख्याही कमी होत आहे. संशोधकांनी धोक्यात आलेल्या प्रजातींच्या रक्षणासाठी अधिक चांगले प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहनही केले आहे. संशोधकांच्या मते, वन्यजीव व्यापाराचा प्रजातींवर कसा परिणाम होतोय, हे समजून घेण्यात विकसित देश कमी पडत आहेत.

'बोलणार नसतील तरच जास्त महिलांना बैठकीला प्रवेश'  

युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमधील प्रा.डेव्हिड एड्‌वर्डस म्हणाले,की वन्यजीवांच्या बहुतांशी कायदेशीर व्यापारानंतरही जगभरातील वनस्पती व प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. आपण विदेशी प्राणी पाळण्याची आवपली इच्छा नियंत्रित करण्याची गरज आहे. 

वनस्पती व प्राण्यांची तस्करी (वार्षिक) दहा कोटी 
जागतिक वन्यजीव व्यापाराची  उलाढाल (वार्षिक) चार ते वीस अब्ज डॉलर

जगभरात पाळण्यासाठी, पारंपरिक औषधे बनविण्यासाठी व खाद्यपदार्थांसाठी प्राण्यांच्या हजारो प्रजातींचा व्यापार केला जातो.त्यामुळे, या प्राण्यांची संख्या कमालीच्या वेगाने घटत आहे. स्थानिक पातळीवरील अनेक प्राणीही नामशेष होत आहेत.
- प्रा. डेव्हिड एडवर्ड्‌स, युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड 

Edited By - Prashant Patil