esakal | ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, ''सोबत बसून समोसा खाऊ!''

बोलून बातमी शोधा

AUS_PM_Morrison

या आठवड्यात मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे. त्यावेळी मी ही इंडियन रेसिपी (भारतीय पक्वान्न) त्यांच्यासोबत शेअर करणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, ''सोबत बसून समोसा खाऊ!''
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया या देशांमधील क्रिकेट युद्ध सर्व क्रिकेट शौकिनांना माहित आहे. मात्र, त्यापलीकडे या दोन्ही देशांमधील मैत्रीचे किस्सेही तितकेच आवडीने ऐकले जातात. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेले ट्विट सध्या भारतीयांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

- कोरोनाचा धोका कायम; पंतप्रधानांच्या 'मन की बात' मधील महत्त्वाच्या १० गोष्टी!

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी आपल्या हातात प्रसिद्ध भारतीय फास्टफूड समोशांनी भरलेला ट्रे घेतला असल्याचे दिसून येत आहे. फोटो पोस्ट करताना मॉरिसन म्हणतात, 'आंब्याच्या चटणीसोबत संडे स्कॉ-मोसा म्हणजे समोसा.' 

- दहा कोटी लोकसंख्येच्या 'या' देशात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; अशी केली मात

ते पुढे म्हणतात, ''या आठवड्यात मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे. त्यावेळी मी ही इंडियन रेसिपी (भारतीय पक्वान्न) त्यांच्यासोबत शेअर करणार आहे.''

या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनीही लगेच रिट्विट करत उत्तर दिले आहे. मोदी लिहतात की, ''कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकली की सोबत बसून समोसे खाण्याचा आनंद लुटू. ४ जूनला भेटू व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये!''

- अमेरिकेत आंदोलनाचा वणवा; सतरा शहरांत तोडफोड, जाळपोळीच्या घटना

येत्या ४ जूनला मॉरिसन आणि मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

- 'मित्रों' हे ऍप वापरत असाल तर सावधान... वाचा सविस्तर बातमी

दरम्यान, गेल्यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन हे जपानमधील ओसाका येथे आयोजित जी-२० परिषदेत भेटले होते. या परिषदेनंतर त्यांनी काढलेला सेल्फी नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. मोदींचे कौतुक करताना 'कितना अच्छा है मोदी' असा उल्लेख मॉरिसन यांनी केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा