'मित्रों' हे ऍप वापरत असाल तर सावधान... वाचा सविस्तर बातमी   

Mitron_app
Mitron_app

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चीनच्या टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लैटफॉर्म ऍप प्रमाणेच असणारे मित्रों ऍप चांगलेच चर्चेत आले आहे. कोरोना महामारीमुळे चीनच्या विरोधात चांगलीच वातावरण निर्मिती सगळीकडे होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. आणि त्यामुळेच अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिकटॉक ऍप डिलीट करत मित्रों या ऍपला स्थान देण्यास सुरवात केली.

आत्तापर्यंत लाखो जणांनी मित्रों हे ऍप डाउनलोड केले आहे. मात्र या ऍपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर येत आहे. अनेक यूजर्सनी या ऍपच्या रिव्ह्यूमध्ये काही दोष असल्याचे लिहिले होते. आणि आता मिळालेल्या माहितीनुसार या ऍपवरून यूजर्सचे अकाउंट ताब्यात घेऊन इतरांना मेसेज देखील पाठवता येत असल्याचे समोर आले आहे.

टिकटॉकसारखेच असणारे मित्रों हे ऍप अतिशय कमी कालावधीत चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र यूजर्सची झोप उडवेल अशी माहिती आता पुढे आली आहे. गॅजेट्स ३६० ने दिलेल्या अहवालानुसार, मित्रों या ऍपमध्ये असलेल्या यूजर्सच्या प्रायव्हसी संदर्भातील त्रुटींमुळे कोणीही यूजर्सचे अकाउंट हॅक करू शकतो. तसेच एखाद्याच्याही अकाउंटवरून दुसऱ्या यूजरच्या पोस्टवर टिप्पणी देखील करू शकत असल्याचे म्हटले आहे.

या अहवालात यूजर्सच्या लॉग-इन प्रोसेसमध्ये त्रुटी निदर्शनात आल्याचे सांगितले आहे. यूजर्स आपले अकाउंट लॉग-इन करत असताना हॅकर्स यूनिक यूजर आईडी मिळवून त्याचा वापर करत असल्याचे म्हटले आहे, पण याव्यतिरिक्त यूजर्सचा ई-मेल आईडी किंवा डेटा हा सुरक्षित असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

सध्या मित्रों हे ऍप वापर करण्यासाठी यूजर्सला कोणताही पासवर्ड अथवा ऍडिशनल व्हेरिफिकेशन करण्याची गरज नसून, गुगल अकाउंटच्या मदतीने लॉग-इन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळेच या ऍपमध्ये आणखी कोणतीही अकाउंट सिक्युरिटी देण्यात आलेली नाही. तसेच गुगल अकाउंटच्या साहाय्याने लॉग-इन होताना देखील ऍप यूनीक यूजर आईडीचा वापर करत असल्याने त्याचा गुगलशी कोणताही संबंध येत नाही. 

मित्रों या ऍपचे लेटेस्ट अपडेट या महिन्याच्या २९ तारखेला आले आहे. मात्र, या अपडेटमध्ये कोणत्याही सुरक्षाविषयक त्रुटी दूर करण्यात आल्या नाहीत. पण हे दोष ठीक करता येऊ शकतात, जेणेकरून यूजर्सचे अकाउंट इतरांना ताब्यात घेता येणार नाही. मागील काही दिवसांपासून हे ऍप भारतात तयार केल्याचे बोलले जात होते. मात्र, पाकिस्तानच्या Qbuxus या कंपनीने हे ऍप विकत घेतले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com