Pakistan| इम्रान खान यांच्या प्रयत्नांना अपयश, द्यावा लागणार राजीनामा ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

imran  khan

Pakistan| इम्रान खान यांच्या प्रयत्नांना अपयश, द्यावा लागणार राजीनामा ?

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राजकीय नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. संसदेचे अध्यक्ष पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास परवानगी देतील अशी आशा विरोधी पक्षांना आहे. जर अध्यक्षांनी प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला किंवा विलंब केल्यास सचिवालयासमोर धरणा दिला जाईल, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. येत्या २२ व २३ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये (Pakistan) मुस्लिम राष्ट्रांच्या (OIC) परराष्ट्र मंत्र्यांची परिषदही होण्याची शक्यता आहे. जर उद्या सोमवारी (ता.२१) संसदेच्या अध्यक्षांकडून प्रस्ताव स्वीकारला गेला तर अविश्वास प्रस्तावावर २८ मार्च रोजी सभागृहात मतदान होईल. पंतप्रधान इम्रान खानवर (Imran Khan) राजकीय दबाव वाढत चालला आहे. (Will Imran Khan Resign From Pakistan PM Post)

हेही वाचा: अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध

गोपीनीय सूत्रांनुसार लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा (Kamar Javed Bajwa) आणि पोलिस महानिरीक्षक (आयएसआय) लेफ्टीनंट जनरल नदीम अंजुमसह चार वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी जनरल्सनी ओआयसी-एफएम परिषदेनंतर इम्रान खान यांना पंतप्रधान पद सोडण्यास सांगितले आहे. माजी लष्करीप्रमुख राहील शरीफ हे लष्करासोबत इम्रान खानच्या वतीने मध्यस्थी करत होते. त्यास अपयश आले आहे. जनरल शरीफ हे इम्रान खानच्या म्हणण्यावरुनच जनरल बाजवा यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.

हेही वाचा: 'काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार'

मात्र त्यांना लष्करीप्रमुखाची समजूत काढण्यास अपयश आले. पाकिस्तान अगोदरच गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी युक्रेन युद्धावरुन (Ukraine War) अमेरिका आणि युरोपीय संघाविरुद्ध भूमिका घेतल्यावरुन लष्कर नाराज आहे. पाकिस्तानी लष्कराने ओआयसी परिषदेनंतर पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा देण्यास सांगण्याने विरोधी पक्ष नेत्यांनी हालचाली वाढवल्या आहेत.