मुस्लिमांबाबत PM मोदींवर बायडन दबाव आणणार? अमेरिकेने दिले उत्तर

Will joe Biden put pressure on PM Modi over Muslims
Will joe Biden put pressure on PM Modi over MuslimsWill joe Biden put pressure on PM Modi over Muslims

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीबाबत भाष्य करण्यात आले आहे. जो बायडन मुस्लिमांच्या हक्कांबाबत पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत मोदींवर दबाव आणतील की नाही याची पुष्टी करू शकत नाही, असे व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले. (Will joe Biden put pressure on PM Modi over Muslims)

जुलैमध्ये I2U2 शिखर परिषदेसाठी दोन्ही देशांचे नेते भेटतील. यावेळी जो बायडन भारतातील मुस्लिमांच्या संरक्षणासाठी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) दबाव आणतील का, असा प्रश्न प्रेस सेक्रेटरींच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले. प्रत्युत्तरात पियरे म्हणाल्या की, याची पुष्टी करू शकत नाही. परंतु, राष्ट्राध्यक्ष बायडन (joe Biden) यांना परदेशी नेत्यांशी मानवी हक्कांबद्दल बोलण्यात कोणतीही अडचण नाही.

Will joe Biden put pressure on PM Modi over Muslims
राजकारणातील ‘अँग्री यंग मॅन’ बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत का गेले?

बायडन यांना नेत्यांशी मानवी हक्क, स्वातंत्र्य, लोकशाहीच्या महत्त्वाविषयी बोलण्यात काहीच अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी बायडन यांच्या अजेंड्यात काय असेल हे मी सांगू शकत नाही. दोन्ही नेते भेटल्यावर काय बोलणार आहेत हे मी निश्चित करू शकत नाही. जेव्हा मानवाधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा बायडन नेत्यांशी थेट बोलण्यात अजिबात संकोच करीत नाही, असेही पियरे म्हणाल्या.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची, विशेषत: मुस्लिमांची मालमत्ता न्यायालयाच्या परवानगीशिवाय बुलडोझरने पाडण्यात येत आहे. बायडन हे १३ ते १६ जुलै रोजी पश्चिम आशियाई देशांना भेट देणार आहेत.

Will joe Biden put pressure on PM Modi over Muslims
नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!

भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष बायडन I2U2 शिखर परिषदेत भेटतील. I2U2 ही भारत, इस्राईल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीची अलीकडेच स्थापन झालेली संस्था आहे. याची पहिली परिषद जुलैमध्ये होणार आहे. नरेंद्र मोदी हे २६ व २७ जून रोजी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे होणाऱ्या ग्रुप ऑफ सेव्हनच्या (G7) बैठकीत सहभागी होत आहेत, जिथे अध्यक्ष बायडन देखील उपस्थित राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com