पतीपासून घटस्फोट घेऊन श्‍वानासोबत थाटला संसार; म्हणते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman married her dog

जर कोणी पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्याशी लग्न केले तर ते खरेच ऐकायला विचित्र वाटते ना.

पतीपासून घटस्फोट घेऊन श्‍वानासोबत थाटला संसार; म्हणते...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पती-पत्नीमध्ये घटस्फोट होणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण जर कोणी पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्याशी लग्न केले तर ते खरेच ऐकायला विचित्र वाटते ना. युनायटेड किंगडममध्ये, एका महिलेने वयाच्या 47 व्या वर्षी तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि तिने तिच्या श्‍वानाला साथीदार म्हणून निवड केली आहे.

अमांडा रॉजर्स नावाच्या महिलेचा दावा आहे की, ती तिच्या श्‍वानासोबत लग्न केल्यानंतर खूप आनंदी आहे. द सनच्या वृत्तानुसार, त्यांनी 2014 मध्ये धूमधडाक्यात लग्न केले आणि श्‍वान शेबाला 200 लोकांसमोर साथीदार मानलं आहे. ही महिला श्‍वानासोबत इतकं चांगले आयुष्य जगत आहे की, लग्नाच्या इतक्या वर्षातही ती कधीच सुखी नव्हती जितकी आता असल्याचं तिनं सांगितलयं.

हेही वाचा: Viral Video| 'जीम'मध्येच नवरीचं 'प्री वेडिंग' फोटोशूट

घटस्फोटानंतर श्‍वानाची हमसफर म्हणून केली निवड

क्रोएशियामध्ये राहणारी अमांडा पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर एकटीच राहत होती. मग एके दिवशी तिने श्‍वान शेबासोबत पूर्ण रितीरिवाजाने लग्न केले. आता अमांडा रॉजर्स म्हणतेय की, शेबा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. दोघेही एकमेकांसोबत हसत-खेळत-आनंदी राहतात आणि दुःखातही साथ देतात. शेबा तिला कधीही त्रास देत नाही.

श्‍वानाच्या डोळ्यात दिसतंय खरं प्रेम

अमांडा सांगते की, तिला शेबाच्या डोळ्यात खरे प्रेम दिसते. दोघांचे एकमेकांसोबत खूप जवळचे नाते आहे. गंमत म्हणजे या लग्नाबद्दल शेबालाही माहिती असल्याचं अमांडा म्हणते. शेबाला जीवनसाथी बनवण्यासाठी तिने गुडघ्यावर बसवून प्रपोज केले. यावर शेबाने शेपूट हलवत हो असे उत्तर दिले. त्या पाळीव प्राण्याला कदाचित या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती नसेल, पण अमांडा स्वतः या झालेल्या लग्नासाठीआनंदी मानते.

loading image
go to top