रुममध्ये एकटी येण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून ऑफर

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी एक महिलेने आरोप करत, हॉटेलमधील रुममध्ये एकटी येण्यासाठी दहा हजार डॉलरची ऑफर दिल्याचा खुलासा केला आहे.

पॉर्नस्टार जेसिका ड्रेक हिने ट्रम्प यांच्यावर आरोप केले आहेत. अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक एक महिन्यावर आली असताना ट्रम्प यांच्यावर हा आरोप झाला आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही महिलेशी अश्लिल संभाषण केल्याची माहिती उघड झाली होती. आता या प्रकरणामुळे ते आणखी अडचणीत आले आहेत. ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत 11 महिलांनी आरोप केले आहेत.

जेसिक ड्रेक यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे, की दहा वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील लेक ताहो येथे गोल्फ स्पर्धेवेळी ट्रम्प यांची भेट झाली होती. त्यांनी त्यावेळी माझी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि मला एकटीला लंचसाठी आमंत्रण दिले. मी अन्य दोघींसह गेली असता त्यांनी मला मिठी मारत थेट चुंबन घेण्यास सुरवात केली. त्यावेळी ट्रम्प यांनी स्वतः मला ऑफर देत रुममध्ये एकटी आल्यास दहा हजार डॉलर देऊ असे सांगितले. 

Web Title: Woman Says Trump Sexually Assaulted Her