esakal | Video: चोराने पिस्तुल दाखवताच महिलेने मॉबने धू-धू धुतले...
sakal

बोलून बातमी शोधा

women fight with theft in shop video viral

चोर एका दुकानात शिरला आणि त्याने पिस्तुल दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. पण, बंदूक दाखवताच महिलेने त्याला ओल्या मॉबने धू-धू धुतले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत

Video: चोराने पिस्तुल दाखवताच महिलेने मॉबने धू-धू धुतले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : चोर एका दुकानात शिरला आणि त्याने पिस्तुल दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. पण, बंदूक दाखवताच महिलेने त्याला ओल्या मॉबने धू-धू धुतले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...

पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यासाठी आलेल्याा तरुणाला एका महिलेनं चांगली अद्दल घडवली आहे. दुकानात घुसलेल्या तरुणाला महिलेने घाबरून न जाता चांगला चोप दिला. महिलेचे रौद्र रुप पाहून हातात पिस्तुल असलेला युवकाने अखेर दुकानातून पळ काढला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका दुकानामध्ये गिऱहाईक नव्हते. यावेळी एक युवक हातात पिस्तुल असलेला युवक दुकानात प्रवेश करून गल्ल्याजवळ येतो. यावेळी साफसफाई करणारी महिला आल्यानंतर तिच्यावर पिस्तुल रोखून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. पण, महिला चिडते आणि हातातील ओला मॉब त्याच्या डोक्यात घालते. शिवाय, मॉबने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करते. महिलेचे रौद्र रुप पाहून चोर दुकानातून पळ काढतो. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. संबंधित व्हिडिओ पोलंड येथील असून, फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली आहे.

Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...