esakal | Video: न्यूज ऍंकर पॅण्ट न घालताच आला लाईव्ह अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

work home blunder reporter caught without pants during live viral video

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरातूनच काम (वर्क फॉर्म होम) करताना दिसतात. वर्क फॉर्म होमदरम्यान एक न्यूज ऍंकर पॅण्ट न घालताच कॅमेऱयासमोर आल्याचा गमतीशीर प्रकार घडला आहे.

Video: न्यूज ऍंकर पॅण्ट न घालताच आला लाईव्ह अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरातूनच काम (वर्क फॉर्म होम) करताना दिसतात. वर्क फॉर्म होमदरम्यान एक न्यूज ऍंकर पॅण्ट न घालताच कॅमेऱयासमोर आल्याचा गमतीशीर प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: ...अन् हत्तीने मारली कोलांटी उडी!

लॉकडाऊनदरम्यान अनेकजण वर्क फ्रॉम होमचा आनंद घेत आहेत. पण, काहीजण कंटाळले आहेत. कारण, घरी सर्व सुविधा असतीलच असे नाही. यामुळे गंमती-जमती समोर येत आहेत. प्रसारमाध्यमांसाठी विशेषतः टीव्हीसाठी काण करणाऱयांना पेहरावाची काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना लाईव्ह रिर्पोटिंग करायचे असतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबीसी न्यूजच्या अँकरसोबत सुद्धा एक गमतीदार प्रकार घटला आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका' या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करत असताना हा अँकर चक्क पॅण्ट न घालताच बसला होता.

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय रीव आपल्या घरातून लाईव्ह प्रसारण करत होता. त्यावेळी त्यांने स्वतःच कॅमेरा सेटअप केला. यावळी त्याने फक्त ब्लेझर घातला होता. कारण तेवढाच भाग कॅमेऱयासमोर दिसणार होता. लाईव्ह सुरू झाल्यानंतर सुरूवातीला व्हिडिओमध्ये छातीच्या वरील भाग दिसत होता. पण, कॅमेरा हालत गेला आणि या अँकरने पॅण्ट घातलेली नाही हे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!

रीवने सांगितले की, ब्लेझरच्या खाली काहीही घातले नव्हते. कारण लाईव्ह येण्याआधी ते वर्कआऊट करत होते. त्यांनी ट्विटरवर लिहले आहे की, 'जेव्हा वर्क फ्रॉममध्ये काहीतरी गडबड होते. तेव्हा तुम्हाला नक्कीच हसू येतं.' याआधी सुद्धा एका महिला अँकरचा वर्क फ्रॉम होमचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्या अँकरचे बाबा लाईव्ह दरम्यान मागे दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.