जागतिक बँकेकडून पाकिस्तानला दिले कर्ज; किती ते वाचा

वृत्तसंस्था
Monday, 25 May 2020

जागतिक बँकेने चार वर्षांच्या खंडानंतर पाकिस्तानसाठी आर्थिक मदतीचा पाठिंबा पूर्ववत केला आहे. आर्थिक खडखडाट झालेल्या या देशाला कोरोना महामारीच्या प्रतिकुल फटक्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून ५०० दशलक्ष डॉलरचे धोरणात्मक कर्ज मंजूर केले आहे.

इस्लामाबाद - जागतिक बँकेने चार वर्षांच्या खंडानंतर पाकिस्तानसाठी आर्थिक मदतीचा पाठिंबा पूर्ववत केला आहे. आर्थिक खडखडाट झालेल्या या देशाला कोरोना महामारीच्या प्रतिकुल फटक्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून ५०० दशलक्ष डॉलरचे धोरणात्मक कर्ज मंजूर केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वॉशिंग्टनस्थित कर्जपुरवठादार संस्थेच्या हवाल्याने एक्सप्रेस ट्रीब्यूनने हे वृत्त दिले आहे. दर्जेदार आरोग्यसेवा, शिक्षणाची संधी, महिलांसाठी आर्थिक संधींना पाठिंबा आणि सामाजिक सुरक्षेचे जाळे भक्कम करणे अशा उद्दीष्टांसाठी वरील रक्कमेच्या उपक्रमास शुक्रवारी बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने मंजुरी दिली.

कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर

सुक्ष्म आर्थिक निर्देशांक खालावल्यामुळे कर्ज रोखण्यात आले होते. आणखी इतक्याच रकमेच्या कर्जाची मंजुरी मात्र पुढे ढकलण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Bank loan to Pakistan