esakal | 2020 पेक्षाही 2021 वर्ष वाईट असेल; WPF च्या अध्यक्षांनी केलं सावध
sakal

बोलून बातमी शोधा

hunger

जर अब्जावधी डॉलर्स रुपयांची मदत मिळाली नाही तर 2021 मध्ये भुकबळीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. 

2020 पेक्षाही 2021 वर्ष वाईट असेल; WPF च्या अध्यक्षांनी केलं सावध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढील वर्ष हे 2020 पेक्षाही वाईट असणार आहे, अशी माहिती वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या (WFP) अध्यक्षांनी दिली आहे. WFP ला 2020 साली शांततेचा नोबेल मिळाला आहे. डेव्हीड बेस्ले हे वर्ल्ड फूड प्रोग्रामचे अध्यक्ष आहेतद असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बेसली यांनी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाला मिळालेल्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने संघाला हे सामर्थ्य दिलं आहे की जगभरातील नेत्यांना जागृत करु शकतील की पुढील वर्ष हे यावर्षीच्या तुलनेत अधिक खराब असणार आहे. या दरम्यान जर अब्जावधी डॉलर्स रुपयांची मदत मिळाली नाही तर 2021 मध्ये भुकबळीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. 

हेही वाचा - ऑस्ट्रेलिया: टीम इंडियाच्या हॉटेलजवळ झाली दुर्घटना; मैदानात कोसळले विमान

WFP चे प्रमुख डेव्हीड बेस्ले यांनी म्हटलंय की, नॉर्वेची नोबेल समिती त्यांच्या कार्याला बघत होती. नैसर्गिक आपत्तींमध्ये, शरणार्थ्यांच्या शिबिरांमध्ये लाखो भूकेल्या लोकांना जेवण देण्याचे काम आपच्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य जोखिममध्ये टाकते. सोबतच जगाला हा संदेशदेखील यातून जातो की अवस्था आणखीनच बिकट होत आहे आणि आणखीन काम करायची गरज आहे. बेस्ले यांनी मागच्या महिन्यात पुरस्काराविषयी म्हटलं होतं की, हे अगदी योग्य वेळेवर प्राप्त झालं आहे. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आणि कोविड-19 महामारी यामुळे ही बातमी जास्त चर्चेत आली नाही. सोबतच जगभरात त्या गोष्टीवर लक्ष गेलं नाही ज्याचा आम्ही सामना करतो.

हेही वाचा - जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा

त्यांनी जागतिक सुरक्षा परिषदेत एप्रिल महिन्यात सांगितलेल्या गोष्टीचा पुनरुच्चार केला की, एकतर जग एकाबाजूला महामारीशी लढत आहे तसेच भुकबळीचीही समस्या तीव्र आहे. जर यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर परिस्थिती आणखीनच खराब होऊ शकते. त्यांनी पुढे म्हटलं की, आपण भूकबळीच्या समस्येला टाळण्यात यशस्वी ठरलो कारण जगातील नेत्यांनी पैशांचा पुरवठा केला, पॅकेजेस दिले. मात्र जे पैसे 2020 मध्ये मिळाले ते 2021 मध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच ते सातत्याने नेत्यांशी बातचित करत आहेत आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीविषयी त्यांना आताच जागृत करत आहे.