esakal | ऑस्ट्रेलिया: टीम इंडियाच्या हॉटेलजवळ झाली दुर्घटना; मैदानात कोसळले विमान
sakal

बोलून बातमी शोधा

plane crash

सिडनीच्या या ऑलंपिक पार्क हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंसह तिथले काही स्थानिक क्रिकेटर आणि काही फुटबॉलपटू देखील थांबले आहेत.

ऑस्ट्रेलिया: टीम इंडियाच्या हॉटेलजवळ झाली दुर्घटना; मैदानात कोसळले विमान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिडनी : टीम इंडियाने काल शनिवारी ऑस्ट्रेलियामध्ये आपले पहिले आऊटडोअर सेशन केले. मात्र हे सेशन करत असताना त्यांच्या मैदानात एक गंभीर अशी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये टीम इंडियातील कोणत्याही खेळाडूला कसलीही दुखापत झालेली नाहीये. सगळे खेळाडू सुरक्षित आहेत. सध्या टीम इंडियाचे खेळाडू सिडनीच्या ऑलंपिक पार्क हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. खेळाडू आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सराव करत असताना एक प्लेन क्रॅश होऊन मैदानात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हॉटेलमध्ये राहिलेल्या लोकांमध्ये भीती पसरली आहे. 

सिडनीच्या या ऑलंपिक पार्क हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंसह तिथले काही स्थानिक क्रिकेटर आणि काही फुटबॉलपटू देखील थांबले आहेत. ही प्लेन क्रॅशची दुर्घटना क्रोमर पार्कमध्ये झाली आहे. यावेळी क्वारंटाईन असणाऱ्या सर्व खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये हिंदूंकडून उत्साहात दिवाळी साजरी, दिव्यांनी सजली मंदिरं
क्रोमर पार्कच्या जवळच क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने खेळले जात होते. हे प्लेन देखील त्याच मैदानात जाऊन क्रॅश  झाले. हे प्लेन अशा जागी जाऊन क्रॅश झाले ज्या जागी खेळाडू नव्हते. जिथून बाकी लोक अंतरावर होते. जेंव्हा हे प्लेन मैदानाच्या दिशेने येताना खेळाडूंनी पाहिले तेंव्हा खेळाडूंनी धावून आपला जीव वाचवला. 

हेही वाचा - जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा

एका ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, क्रोमर क्रिकेट क्लबचे व्हाईस प्रेसिडेंटने या घटनेबाबत सांगितलं की, मी सर्व लोकांना ओरडून या घटनेबाबत सावध केलं. सर्व खेळाडू आपल्या सुरक्षेसाठी धावू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्लेन एका फ्लाईंग स्कूलचे होते. त्याचे इंजिन खराब झाल्याने ते क्रॅश झाले. या प्लेनमध्ये दोन जण होते. ते सुरक्षित आहेत. त्यांना सध्या दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.