2050 मध्ये जगाची लोकसंख्या असेल 9.8 अब्ज !

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे 8.3 कोटींची भर पडत आहे. यामुळे प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.6 अब्ज; 2050 पर्यंत 9.8 अब्ज; तर 2100 पर्यंत 11.2 अब्ज इतकी असेल

न्यूयॉर्क - जगामधील एकूण लोकसंख्या 2050 पर्यंत तब्बल 9.8 अब्ज इतकी होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. जगाची लोकसंख्या सध्या 7.6 अब्ज इतकी आहे.

याचबरोबर, 2024 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, असेही या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

या अहवालामधील अन्य महत्त्वपूर्ण अंदाज -

2050 पर्यंत नायजेरिया हा अमेरिकेस मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल

दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे 8.3 कोटींची भर पडत आहे. यामुळे प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.6 अब्ज; 2050 पर्यंत 9.8 अब्ज; तर 2100 पर्यंत 11.2 अब्ज इतकी असेल

नायजेरियामधील लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. याशिवाय 2050 पर्यंत आफ्रिकेमधील 26 देशांमधील लोकसंख्या वाढीचा वेग "किमान दुप्पट' झाला असेल

सध्या जगातील वृद्ध नागरिकांची संख्या 96.2 कोटी इतकी आहे; 2050 पर्यंत ती 2.1 अब्ज; तर 2100 मध्ये ती 3.1 अब्ज इतकी असेल.

Web Title: World population to reach 9.8 billion in 2050