Space Hotel: जगातील पहिले स्पेस हॉटेल 2025 मध्ये होणार सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world's first space hotel

Space Hotel: जगातील पहिले स्पेस हॉटेल 2025 मध्ये होणार सुरु

माणसाने नवनवीन शोध लावत स्वत:ची प्रगती केली आहे. आता अमेरिकेतील एक स्पेस कंपनी अंतराळात हॉटेल उघडणार अमेरिकन स्पेस कंस्ट्रक्शन कंपनी ऑर्बिटल असेंबली कॉर्पोरेशन (Orbital Assembly) लवकरच चक्क अंतराळात हॉटेल उघडणार असून हे जगातील पहिले स्पेस हॉटेल असणार. (World’s first space hotel will open in 2025)

हेही वाचा: अ‍ॅपलचा भारतीय युजर्सना दणका; कंपनीने घेतला मोठा निर्णय

हे स्पेस हॉटेल 2025 उघडणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचे नाव पायोनियर स्टेशन (Pioneer Station) असणार. पायोनियर 2 आठवड्यांसाठी एकाच वेळी 28 लोकांना सामावून घेण्यास सक्षम असेल.

पायोनियर स्टेशन व्यतिरिक्त 2027 मध्ये व्हॉयजर स्टेशन नावाचे अजून एक स्पेस हॉटेल उघडले जाईल, असेही कंपनीने सांगितले आहे व्हॉयेजरची क्षमता 400 लोकांची असणार आहे.

हेही वाचा: Birth Date टाकण्याची Instagram ची सक्ती, काय आहे कारण?

अंतराळ हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 2019 मध्ये जगासमोर मांडण्यात आला होता. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल एका फिरत्या चाकाच्या आकारात असणार असून जे पृथ्वीभोवती फिरणार आहे. या हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना हॉटेल खिडक्यांमधून अंतराळातील विविध दृश्य पाहता येईल. कॅलिफोर्निया स्थित कंपनी गेटवे फाऊंडेशनकडून या हॉटेलला साकारण्यासाठी निधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Worlds First Space Hotel Will Open In 2025

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top