मास्क लावून धावणाऱ्या तरुणाचे फुफ्फुस फुटलं; वुहानमधील घटना

running
running
Updated on
Summary

तोंडावर मास्क लावून धावणाऱ्या एका व्यक्तीचे फुफ्फुस फुटल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूचे केंद्र ठरलेल्या वुहान शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 26 वर्षीय व्यक्ती जॉगिंग करत होता

बिजिंग- तोंडावर मास्क लावून धावणाऱ्या एका व्यक्तीचे फुफ्फुस फुटल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूचे केंद्र ठरलेल्या वुहान शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक 26 वर्षीय व्यक्ती जॉगिंग करत होता. त्यावेळी दोन किलोमीटर धावल्यानंतर तो अचानक कोसळला. त्याला वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. (Wuhan man suffers collapsed lung while running with face mask)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीचे डावे फुफ्फुस 90 टक्के संकुचित झाले होते. त्यामुळे त्याचे हृदय शरीराच्या उजव्या बाजूला सरकले. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते याला pneumothorax असं म्हटलं जातं. अशाप्रकारची घटना दुर्मिळ असते. यामध्ये फुफ्फुस आणि छातीच्या मध्ये हवा जमा होते. त्यामुळे फुफ्फुस संकुचित होते. याचा प्रभाव श्वास घेण्यावर होता आणि गंभीर परिणामाला सामोरं जावं लागू शकतं. वेळीच उपचार न झाल्याच मृत्यू होण्याची शक्यता असते.

running
युक्रेनमध्ये महिला जवानांची बुटं का ठरलीयत वादग्रस्त?

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्यक्तीने मास्क लावून धावल्याने त्याचे फुफ्फुस फुटले. व्यक्तीला सुरुवातीपासूनच pneumothorax आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनमधील दोन अल्पवयीन मुलांचा जीममध्ये व्यायाम करत असताना मृत्यू झाला होता. 14 वर्षीय मुले मास्क लावून व्यायाम करत होते. एका मुलाच्या मृत्यू प्रमाणपत्रानुसार हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्वांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. कारण, कोरोना विषाणू हवेच्या माध्यमातून पसरत असतो. पण, मास्कच्या अति वापराचे धोके आता दिसून येऊ लागले आहे. मास्क लावल्याने ऑक्सिजन कमी प्रमाणात शरीरात घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हृदयासंबंधी आजार बळावू शकतात. व्यायाम करताना किंवा धावताना मास्कचा वापर न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com