जागतिक दर्जाचे सैन्य करण्याकडे लक्ष द्या

xi jinping
xi jinping

बीजिंग - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक दर्जाचे सैन्य तयार करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांना केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता.

शी जिनपिंग हे सैन्य आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आहेत. सैन्याला अत्याधुनिक शस्त्रात्रे देऊन त्यांचे आधुनिकीकरण करण्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिला होता. या आधुनिकीकरणात त्यांनी सैन्यात विमानवाहू नौका आणि जेट विमानांचा समावेश आहे. सैन्यातील भ्रष्टाचारावरही जिनपिंग यांनी लक्ष्य केंद्रित केले असून, या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. आपल्या नव्या स्थायी समितीच्या निवडीनंतर बुधवारी त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पहिली जाहीर सभा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com