यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविनाच

oscarsgetty
oscarsgetty

लॉस एंजेलिस - हलक्याफुलक्या विनोदी शैलीत केवळ चित्रपटच नाही तर सामाजिक, राजकीय विषयांवरही भाष्य करणारा सूत्रसंचालक हे ऑस्कर सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. परंतु, यंदाचा ऑस्कर सोहळा याला अपवाद ठरला आहे, यंदा ऑस्कर सोहळा हा सूत्रसंचालकाविनाच पार पडतो आहे.

1989 नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडत आहे. एबीसी एन्टरटेन्मेन्ट ऍकॅडमी अवॉर्ड्स ऑस्करचे थेट प्रक्षेपण करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सूत्रसंचालक नसल्यामुळे पुरस्कार देणाऱ्या सेलिब्रिटीजवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे एबीसी एन्टरटेन्मेन्टच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

कॉमेडियन केविन हार्ट यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार होते. 2010 मध्ये समलैंगिक संबंधाबद्दल केलेल्या टिप्पणीचा वाद उफाळून आल्यानंतर केविन यांनी डिसेंबरमध्ये माघार घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com