येमेन सैन्यावर अल कायदाचा हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

अदेन: दक्षिणपूर्व येमेनमध्ये आज संशयित अल कायदाच्या दहशतवाद्यांनी येमेन सैन्याच्या छावणीवर कार बॉंब आणि गोळीबार करीत हल्ला केला. यामध्ये किमान दहा दहशतवादी आणि दोन सैनिक ठार झाले, असे येमेनी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तेलाचे साठे असलेल्या हदरमाउंट प्रांतातील बदाह गावाजवळ हल्ले केले. हल्लेखोरांनी सैन्याच्या छावणीच्या बाहेर दोन कार बॉंबस्फोट घडवून आणले. दोन मोठ्या स्फोटांनंतर गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले. आमच्या सैन्याने हा हल्ला परतवून लावला असून, आमची छावणी सुरक्षित आहे आणि आम्ही आजूबाजूच्या शेतातून पुढे सरकत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: yemen news and al qaeda attack