esakal | पाकमधील वृत्तपत्राकडून योगी आदित्यनाथना दाद
sakal

बोलून बातमी शोधा

yogi-adityanath

‘डॉन’ या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्राने कोरोनाविरोधी लढ्याच्यासंदर्भात भारतामधील दोन राज्यांशी तुलना केली आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले आहे, तर महाराष्ट्रावर टीका केली आहे.

पाकमधील वृत्तपत्राकडून योगी आदित्यनाथना दाद

sakal_logo
By
यूएनआय

लाहोर - ‘डॉन’ या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्राने कोरोनाविरोधी लढ्याच्यासंदर्भात भारतामधील दोन राज्यांशी तुलना केली आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले आहे, तर महाराष्ट्रावर टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘डॉन’चे संपादक फहाद हुसेन यांनी दोन ट्विट केली आहेत. यात नकाशाही आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘पाकपेक्षा लोकसंख्या जास्त (२२ कोटी ५० लाख- २० कोटी ८० लाख) असूनही मृत्यूदर कमी असल्यामुळे उत्तर प्रदेशने नेमके काय बरोबर केले हे जाणून घेतलेच पाहिजे. पाकमधील मृत्यूदर जवळपास सात पट जास्त आहे. दोन्ही ठिकाणचे स्वरूप व साक्षरता जवळपास सारखीच आहे. पाकमध्ये लोकसंख्येची घनता कमी, तर एकूण देशांतर्गत उत्पन्न जास्त आहे. उत्तर प्रदेशने लॉकडाउन कडक पाळले, तर आपण नाही. त्यामुळेच हा फरक राहिला.’

भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार?

दुसऱ्या ट्‌विटमध्ये हुसेन म्हणतात की, ‘भारताच्या पश्‍चिमेतील महाराष्ट्राची कामगिरी पाकच्या तुलनेत धक्कादायक आहे. तेथील मृत्यूदर जास्त आहे. यावरून अयोग्य निर्णय आणि त्याचे घातक दुष्परिणाम स्पष्ट होतात. तेथील लोकसंख्या तरुण असून एकूण देशांतर्गत उत्त्पन्न जास्त आहे. अशावेळी उत्तर प्रदेशने काय योग्य व महाराष्ट्राने काय चुकीचे केले हे समजून घेत आपण योग्य धडे गिरविलेच पाहिजेत.’

loading image