Video: फुग्यावर ठेवली खुर्ची अन् लागला नाचायला...

वृत्तसंस्था
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

फुग्यावर खुर्ची ठेवली आणि त्यावर डान्स केला. पण हा डान्स केला आहे तब्बल 3280 फूट उंचीवर. यामुळे नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

पॅरिस : फुग्यावर खुर्ची ठेवली आणि त्यावर डान्स केला. पण हा डान्स केला आहे तब्बल 3280 फूट उंचीवर. यामुळे नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

पश्चिम फ्रान्समध्ये हॉट एयर बलूनवर चढून डान्स करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे रेमी ऑवरार्ड. 26 वर्षाच्या रेमीने 3280 फूट उंचीच्या फुग्यावर चढून डान्स केला. त्याने या फुग्यावर मेटलची खुर्ची ठेवून त्यावर बसून वेगवेगळी प्रात्यक्षिके केली. एवढ्या उंचावर जावून हॉट बलूनवर आत्तापर्यंत कोणीही डान्स केलेला नसल्यामुळे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

रेमी म्हणाला, 'फुग्यावर चढत असताना जेव्हा त्यात हवा भरली जात होती तेव्हा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचावर बॅलन्स करणे एक आव्हान होते. पण, या आव्हानाला सामोरे जात डान्स केला. आयुष्यातला एक वेगळा अनुभव आहे.'

Video: दोघे जण माझ्या मागे बसले आहेत...

या फुग्यावर एक मेटलची खुर्ची ठेवण्यात आली होती. या खुर्चीवर चढून रेमीने डान्स केला असून, यासाठी त्याच्या वडीलांनी मदत केली आहे. दरम्यान, यापूर्वी २०१६ मध्ये स्काई ड्रिफ्टर्स हॉट एयर बलूनवर डान्स करणाऱ्या एका व्यक्तीने अशाच प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth dancing top of hot ballon at france