
Goa Election: रोजगारनिर्मिती करू, महिलांना आरक्षण देऊ; ‘तृणमूल’- ‘मगोप’चे आश्वासन
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. नागरिकांचा सर्वांगीण विकास, साधनसामुग्रीची निर्मिती यावर बेतलेल्या या जाहीरनाम्यामध्ये १० प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. (Goa Assembly Election Updates)
तृणमूल-मगोपच्या या जाहीरनाम्यात विविध योजना सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे. दोन लाख रोजगार निर्मिती, गृहलक्ष्मी योजना, आरोग्य आणि शिक्षणावरील अर्थसंकल्पीय खर्चामध्ये वाढ, घरांची मालकी हक्क, महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरीमध्ये आरक्षण, सार्वजनिक आरोग्य, मोफत पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा यासारख्या योजनांचा त्यात समावेश आहे. महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी दोन जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे आश्वासहनी जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा: जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा; चालक बेपत्ता
गोव्यात १९७६ पूर्वीपासून राहणाऱ्या सर्व कुटुंबांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे शीर्षक आणि मालकी हक्क देणार असल्याचे तृणमूल काँग्रेस-मगोपने म्हटले आहे. तसेच बेघर कुटुंबांना ५० हजार अनुदानित घरे देण्याचे आश्वासहनही देण्यात आले आहे. याशिवाय, आमचे सरकार स्थापन झाल्याच्या २५० दिवसांच्या आत उत्खनन करार आणि खाणकाम नोकऱ्यांमध्ये गोव्यासाठी ८० टक्के आरक्षणासह पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत खाण पद्धतींची स्थापना करण्याचे आश्वासहनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यातील मुद्दे
गोव्याची जीडीपी वाढवणे
दोन लाख नवीन नोकऱ्या निर्माण करणार
गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेच्या खात्यात दरमहा ५००० रुपयांचे थेट हस्तांतर
युवकांना २० लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज
वर्षातून ६ महिन्यांपर्यंत बेरोजगारी विम्याची तरतूद
खासगी क्षेत्रासह सर्व नोकऱ्यांत गोव्यातील महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण
Web Title: Goa Assembly Election Updates Trinomool Congress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..