उत्पल पर्रीकरांबद्दलचा 'तो' शब्द सेनेनं पाळला; राऊतांनी दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Utpal Parrikar
उत्पल पर्रीकरांबद्दलचा 'तो' शब्द सेनेनं पाळला; राऊतांनी दिली माहिती

उत्पल पर्रीकरांबद्दलचा 'तो' शब्द सेनेनं पाळला; राऊतांनी दिली माहिती

गोव्याच्या निवडणुकीत (GoaAssembly Elections 2022) भाजपसाठी (BJP) एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने डावलल्याने, हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास सेना (Shivsena) उमेदवार देणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर उत्पल पर्रीकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरताच सेनेनं आपला शब्द पाळत सेनेचा उमेदवार मागे घेतला आहे.

हेही वाचा: यादव कुटुंबातच रंगणार सामना? युपीमध्ये भाजपचा मास्टर स्ट्रोक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या निवडणुकीत शिवसेनेनं देखील उडी घेतली आहे. गोव्यात उत्पल पर्रीकर यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवणार नाही असा शब्द सेनेनं दिला होता. तो शब्द आम्ही पाळला असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उत्प पर्रीकर यांचा अर्ज वैध ठरताच शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून माघार घेतली आहे. या निवडणुकीत आम्ही उत्पल पर्रीकर यांना समर्थन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा: राहुल गांधींना झालाय 'मोदी फोबिया'; अमित शहांचा गोव्यात हल्लाबोल

शिवसेनेनं घेतलेला हा निर्णय गोव्याचं राजकारण सुधारण्यासाठी असल्याचं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Shivsena Is Withdrawing Its Candidate Shailendra Velingkar Frm Panaji For Utpal Parrikar Assembly Elections 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top