यादव कुटुंबातच रंगणार सामना? अखिलेश यांच्याविरोधात भाजपची खेळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav - Aparna Yadav
यादव कुटुंबातच रंगणार सामना? अखिलेश यांच्याविरोधात भाजपची खेळी

यादव कुटुंबातच रंगणार सामना? युपीमध्ये भाजपचा मास्टर स्ट्रोक

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections 2022) रणधुमाळीला सुरूवात झाली असून, निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (AKhilesh Yadav) यांचा परिवार चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वीच मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने ही निवडणूक जास्त रंगतदार होणार असल्याचं दिसतंय. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पंजाब : काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा चन्नीच? दोन जागांवर मिळाली उमेदवारी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निवडणुकीसाठी सर्व ताकद पनाला लावलेली दिसतेय. मात्र आता भारतीय जनता पक्ष एक वेगळी खेळी करायच्या तयारीत आहे. अपर्णा यादव यांनाच अखिलेश यादव यांच्याविरोधात करहल मतदारसंघातून भाजप तिकीट देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अपर्णा यादव आणि अखिलेश यादल यांच्यात अर्थातच यादव कुटुंबातच ही मुख्यलढत होणार आहे.

हेही वाचा: प्रचार सभांवरील बंदी उठणार? निवडणूक आयोगाची उद्या बैठक

दरम्यान, अखिलेश यादव आज करहल मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपने मात्र अजून करहलमधून कोण लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे ऐनवेळी अपर्णा यादव यांना तिकीट देऊन भाजप अखिलेश यादव यांच्यासमोर नवा पेच निर्माण करू शकतो.

Web Title: Akhilesh Yadav Vs Aparna Yadav Bjp Planing For New Game In Uttar Pradesh Assembly Elections 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top