लस नेमकं कशी काम करते? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 January 2021

लसीकरणाबाबात अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत.

नवी दिल्ली- 2020 वर्ष संपलं असून जगभरातील लोकांनी 2021 चे उत्साहाने स्वागत केले. 2020 मध्ये थैमान घालणारं कोरोनाचा संकट अजूनही संपलेलं नाही. 2021 मध्ये महामारी कोणतं रुप घेते हे पाहावं लागणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2021 मध्ये कोरोना लशीची उपलब्धता होऊ लागली आहे. त्यामुळे विषाणूवर मात करण्याची आशा निर्माण झाली आहे. 

अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली आहे. भारतामध्येही दोन लशींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशातही लशीकरण सुरु होईल. या पार्श्वभूमीवर लसीकरणाबाबात अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. लशीचे काही दुष्परिणाम होतात का? लस शरीरात कशापद्धतीने काम करते? लस घेतल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी? असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे. The Bridge Chronicle ने डॉ. हरिश चाफले यांच्याशी चर्चा करुन या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केलाय... 

Corona Update : देशात रुग्णसंख्या मंदावली, नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनमध्ये...

विषाणूविरोधात लस कशी काम करते? 

कमकुवत किंवा मृत विषाणू इंजेक्शनच्या साहाय्याने लोकांच्या शरीरात सोडले जातात. त्यानंतर पाढऱ्या रक्तपेशी शरीरात अॅटीबॉडीज तयार करण्यास प्रोत्साहन देतात. लशीमुळे शरीरातील इम्युनिटी सक्रिय होते. त्यामुळे शरीरात विषाणूचा प्रवेश झाला, तरी त्याच्याविरोधात लढण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात इम्युनिटी तयार झालेली असते. 

किती काळापर्यंत शरीरात लशीचा प्रभाव राहतो? 

एकदा लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, जे विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करतात. पण, या अँटीबॉडीज शरीरात किती काळापर्यंत टिकतात याबाबत नक्की सांगता येत नाही. लशीनुसार याचा कालावधी बदलू शकतो. कोरोना लशीच्या प्रभावीपणाबाबत माहिती काही काळाने स्पष्ट होईल. 

लशीचे वेगवेगळे प्रकार असतात का?

लशीचे चार प्रमुख प्रकार आहेत. 1) संपूर्ण विषाणू लस Whole Virus vaccine 2) प्रथिने सबुनेट लस Protein subunit vaccine 3) व्हायरल वेक्टर लस Viral vector vaccine 4) न्यूक्लिक अॅसिड लस Nucleic acid (RNA DNA)

'बॉन्ड'पटातील अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स जिवंत; ऑनलाईन मुलाखत देताना...

लस घेऊन सुद्धा तुम्हाला विषाणूची लागण होऊ शकते का?

हो, लस घेऊन सुद्धा तुम्हाला विषाणूची लागण होऊ शकते. शरीरात विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्यास असं होऊ शकतं. लसीवरही ते अवलंबून आहे. इम्युनिटी तयार होण्यासाठी एकापेक्षा अधिक लस घ्याव्या लागू शकतात. 

लशीचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

इंजेक्शन घेतलेल्या जागेवर दुखणे. थकवा, अंगदुखी, ताप असे दुष्परिणाम दिसू शकतात. 0.5 टक्के लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम क्वचितच दिसून येतात. 

वेगवेगळ्या गटातील लोकांसाठी वेगवेगळी लस असते का? 

हो, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळी लस दिली जाते. पण, सध्या कोरोनाची लस लहान मुलांना देण्यात आलेली नाही.

वरील माहिती लशीबाबत पसरणाऱ्या चुकीच्या बातम्यांना आळा घालण्यासाठी असून विशेषत: कोविड-19 बाबत नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Understand What is a vaccine and how does it work on the virus