
जेम्स बॉन्ड सिरीजमधील प्रसिद्ध फिल्म 'अ व्यू टू किल'मध्ये काम केलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती.
नवी दिल्ली : जेम्स बॉन्ड सिरीजमधील प्रसिद्ध फिल्म 'अ व्यू टू किल'मध्ये काम केलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र आता ही बातमी खोटी असल्याची माहिती मिळत आहे. तिचे पती लान्स ओ ब्रायन यासंदर्भात एका ऑनलाईन इंटरव्ह्यूमध्ये होते. त्या दरम्यान असताना त्यांना याबाबतचा कॉल आला. तुम्ही मला आता सांगत आहात की ती जिवंत आहे? त्यांनी रॉबर्ट जिवंत असल्याचं कळल्यावर आश्चर्याने म्हटलं. फोन ठेवून त्यांनी त्या इंटरव्ह्यूदरम्यानच म्हटलं की ती जिवंत आहे, मला आयसीयूमधून फोन आला आहे.
हेही वाचा - ब्रिटनमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर; कोरोना संक्रमणाचा वाढला कहर
हॉलिवूड अभिनेत्री तान्या रॉबर्ट्स या आजारी पडल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट आहेत. काही बातम्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली होती. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे आता समजत आहे. रॉबर्ट्सचे पीअर माइक पिंगल यांनी आता मीडियाला माहिती दिली आहे की, तान्या रॉबर्ट्स जिवंत आहेत मात्र त्यांची अवस्था बिकट आहे. 24 डिसेंबर रोजी आजारी पडल्यानंतर रविवारी तान्या रॉबर्ट्स यांचं निधन झाल्याची बातमी आलेली. मात्र, आता हॉस्पिटलने निर्वाळा दिला आहे की त्या जिवंत आहेत. ख्रिसमस दिवशी तान्या आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला गेल्या होत्या आणि येताना त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या. यानंतर तान्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तिथे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
तान्या रॉबर्ट्सचे खरे नाव व्हिक्टोरीया लीग ब्लम होते. त्यांनी मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर करण्यास सुरवात केली. त्यांनी 1975 मध्ये हॉरर फिल्म 'फोर्स्ड एंट्री'मधून ऍक्टींगमध्ये डेब्यू केला होता. तान्या यांनी डिटेक्विट शो 'चार्लीच एंजल्स'मध्येही काम केलं होतं.