एक असा रोग ज्याची दरवर्षी 45 कोटी लोकांना होते लागण, पण कोणीही त्याबद्दल बोलत नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 16 November 2020

2020 मध्ये कोरोना विषाणूने सर्वांचं लक्ष वेधले

2020 मध्ये कोरोना विषाणूने सर्वांचं लक्ष वेधले. त्याच बरोबर कँसर आणि एड्स या सारख्या हाय प्रोफाईल रोगांकडे वैज्ञानिक जगत आणि माध्यमांचे लक्ष जाते. पण, खरुजसारख्या Scabies रोगांकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं.   

खरुज (शरीराची खाज)  हा दुर्लक्षित रोग समजला जातो. खरुज हा मायक्रोस्कोपिक माईट्समुळे (सार्कोप्टीस स्केबीज) होतो. हे सुक्ष्म जीव आपल्या त्वचेखाली अंडी घालतात. त्वचा हे अतिक्रमण सहजासहजी घेत नाही, त्यामुळे त्वचेची खाज सुरु होते. विशेष करुन रात्री ही खाज जास्त जाणवते. जवळपास 45.5 कोटी खरुजाची प्रकरणे दरवर्षी जगभरात सापडतात. गरीब देशांप्रमाणेच श्रीमंत देशांमध्येही खरुजाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. 

आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे   

खरुजामुळे लोकांचा जीव जात नाही. त्यामुळे याची हेडलाईन बनत नाही. पण, खरुज किंवा खाजण्याच्या रोगाला कमी लेखने महागात पडू शकते. यामुळे मानसाच्या राहणीमानाचा दर्जा खालावू शकतो. या रोगाचे एकापासून दुसऱ्याला संक्रमण होऊ शकते. एकमेंकांचे पांघरुन, टॉवेल, साबण वापरल्यामुळे या रोगाचा प्रसार होऊ शकतो. विशेष करुन लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांमध्ये याचे संक्रमण लवकर होते.  पहिल्यांदा ज्या व्यक्तीला खरुजची लागण होते, त्यांना कोणतेही खाजाची लक्षणे काही आठवडे दिसून येत नाही.

निवारण

खरुज हा अस्वच्छतेमुळे होत असतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. दररोज अंघोळ करणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, एकदा वापरेले कपडे धुतल्याशिवाय पुन्हा न वापरणे, दुसऱ्यांनी वापरलेले कपडे न घालणे महत्वाचे आहे. एकाला खरुज झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनाही त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकाला खरुजचे निदान झाल्यास त्या व्यक्तीने गेल्या काही दिवसात वापरलेले कपडे आणि अंथरुन-पांघरुन गरम पाण्यात धुवून घेतले पाहिजेत. त्यानंतर या कपड्यांना कडक उन्हात ठेवले पाहिजे.

उपचार

खरुजावरील उपचारासाठी बाजारात अनेकप्रकारचे लोशन उपलब्ध आहेत. लोशन त्वचेवर लावून ते 12 ते 24 तास ठेवू शकतो. अनेक दिवस याचा वापर केल्यास फरक जाणवू शकतो. शिवाय डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु केल्यास खरुजवर मात करता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 455 million people get Scabies disease every year