esakal | केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायद्याचे; जाणून घ्या कसे I Health
sakal

बोलून बातमी शोधा

केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायद्याचे; जाणून घ्या कसे

सध्या ही परंपरा कमी होत असून काही औपचारिक कार्यक्रमात किंवा समारंभाला याचा वापर केला जातो.

केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायद्याचे; जाणून घ्या कसे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपण अनेक दाक्षिणात्य घरांमध्ये किंवा काही हॉटेल्समध्ये पदार्थ केळीच्या पानातून वाढताना पाहिले असेल. किंबहूना असा अनुभवही आपण घेतला असाल. खूप वर्षापासूनची देशातील ही एक पारंपारिक परंपरा असल्याचे मानले जाते. देवांसाठी नैवेद्य द्यायचे झाल्यास केळीच्या पानांचा वापर केला जातो. सध्या आता ही परंपरा कमी होत असून काही औपचारिक कार्यक्रमात किंवा समारंभाला याचा वापर केला जातो. परंतु या केळीच्या पानांचा वापर करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामधून आपण गरमागरम पदार्थ वाढल्यास या पानांत उपलब्ध असलेले न्युट्रीशन आणि अॅंटीऑक्सिडंटचे तत्व आहार अधिक हेल्दी बनवतात. अनेक पदार्थ या पानातून खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात हे आपण आता जाणून घेणार आहोत.

पचन क्रियेसाठी होते मदत

केळीचे पान हे प्लांट कपांऊडने भरलेले असल्याने आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे अनेक आजार दूर होतात. यामध्ये असलेले अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण शरीरासाठी फायद्याचे ठरते. या पानांतून अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनक्रीया सुधारते.

हेही वाचा: तुम्ही खाताय ते वाटाणे रंगवलेले तर नाहीत ना? पहा कसे ओळखायचे?

स्वाद वाढवते

एखादा पदार्थ केळीच्या पानातून खाल्ल्याने त्याचा स्वाद वाढतो असे मानले जाते. गरम पदार्थ यावर ठेवल्याने याचे लेअर विरघळून पदार्थात मिसळतात आणि ते अजून स्वादिष्ट होतात.

रसायन फ्री पदार्थ

जेव्हा आपण स्टील किंवा प्लॅस्टिकच्या काही भांड्यांतून अन्नपदार्थ खात असतो, तेव्हा त्याचे काही रासायनिक तत्व त्यात मिसळतात. याउलट केळीच्या पानामुळे रसायनिक मुक्त आणि हेल्दी पदार्थ आपण खाऊ शकतो.

इको फ्रेंडली

प्लास्टिकचे प्लेट किंवा काही अन्य वस्तू या पर्यावरणला घातक आहेत. तर एका बाजूला केळीची पाने ही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत.

हेही वाचा: केळी खाणे आरोग्यदायी; आरोग्यशास्त्रात फार महत्त्व

loading image
go to top