esakal | कसा असावा कोरोना काळातला सेक्स; तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

बोलून बातमी शोधा

कसा असावा कोरोना काळातला सेक्स; तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी
कसा असावा कोरोना काळातला सेक्स; तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

सध्या जग एका मोठ्या संकटात अडकलेलं आहे. आणि या काळात आपल्याला मनात अनेक शंका-कुशंका आहेत. त्यातीलच एक शंका म्हणजे या काळात आपण शारिरीक संबंध ठेवावेत का? आणि ठेवावेत तर ते कसे? कारण या जागतिक महासाथीच्या दरम्यान मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि वारंवार हात स्वच्छ करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असताना शारिरीक संबंध कसे ठेवावेत, हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तर तुम्हाला याविषयी नीटशी आणि पुरेशी माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वांत महत्त्वाची आणि चांगली गोष्ट अशी आहे की, हो! तुम्ही या काळात देखील सेक्स करु शकता. मात्र, सेक्स करताना काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला पाळाव्याच लागतील. कदाचित त्यामुळे तुमचा हिरमोड होऊ शकेल. पण या ऐन संकटात आपल्याला काही गोष्टींचं भान असणं आवश्यक आहे. सेफ सेक्स कसा करावा याविषयी सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत, मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, सेफ सेक्स ही बाब या जागतिक महासंकटाच्या आधी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

दुर्दैवाने सध्या सेक्सच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती लेझर सायन्सेस या जर्नलने दिली आहे. ही बाब भीतीदायक आहे. सेक्स आपल्या मनावरील ताणतणाव दूर करण्यात मदत करतो. संशोधनानुसार असं म्हटलं जातं की कोणताही शारीरिक संबंध, अगदी हलकी मिठी किंवा 10-20 सेकंदांपर्यंतचा किस या धकाधकीच्या काळात मोठा मूड बूस्टर ठरु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात, काही अशा टिप्स ज्या तुम्हाला या महासाथीच्या काळात देखील उपयोगी ठरतील.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोनाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या सेक्स लाईफवर होतो अधिक परिणाम

हेही वाचा: कोरोना काळात सेक्स लाईफ कसं असायला हवं?

1. जोडीदाराची सहमती

तुम्ही फक्त आपल्या पार्टनरचा हात धराल अथवा मीठी माराल, सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पार्टनरची सहमती. त्यामुळे सेक्ससंदर्भातील काहीही करत असाल, सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पार्टनरची सहमती. त्यामुळे आपल्या पार्टनरशी आधी बोला आणि त्याला तुमच्यासोबत तितकंच सहज होऊ द्या. तरच तुमचा सेक्स सुंदर होऊ शकतो.

2. कोरोना टेस्टींगबद्दल बोला

जर तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर आपल्या पार्टनरला याची कल्पना द्या. कारण अशावेळी तुमच्या पार्टनरला देखील कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या चाचणीबद्दल तुमच्या पार्टनरला कल्पना द्या. त्याच्यासोबत लपवाछपवी करु नका. त्याच्याशी खोटं बोलू नका. याआधी तुम्ही कधी संक्रमित झाला होता का? तर त्याचीही मोकळेपणाने त्या व्यक्तीला माहिती द्या आणि मगच त्याच्यासोबत सेक्स करा.

3. रिस्कबाबत जागरुक रहा

जर तुमच्या पार्टनरमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील आणि दोघेही कोरोना निगेटिव्ह असाल तर शारीरिक संबंध ठेवण्यात काही हरकत नाही, पण जर एखाद्या व्यक्तीने कोरोनाबाधित असलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवले असतील तर काही आवश्यक गोष्टी पाळणे गरजेचे आहे. सेक्सच्या आधी आणि त्यानंतर लगेचच संपूर्ण शरीर साबणाने नीट स्वच्छ केले तर संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच सेक्स करताना कंडोमचा वापर करूनही कोरोनाची रिस्क कमी करता येऊ शकते. तुमच्या श्वास घेण्यातून, बोलण्यातून, खोकण्यातून आणि शिंकण्यातून निर्माण होणारे कोरोनाचे विषाणू असलेले लहान थेंब हे कोरोनाचे वाहक असतात. त्यामुळे सेक्स करण्याआधी आणि केल्यानंतर पुरेशी काळजी घेणे महत्त्वाचे ठरेत.

4. सेफ सेक्स अधिक चांगला

योनीस्त्रावात किंवा पुरुषाच्या वीर्यस्खलनात कोरोनाचा विषाणू आहे की नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाहीये. मात्र कोरोना मानवी विष्ठेमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या काळात शारीरिक संबंध मार्यादीत प्रमाणात ठेवणंच अधिक चांगलं आहे. मात्र, जर आपल्या जोडीदारामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत किंवा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे तर शारीरिक संबंध न ठेवणेच सर्वात चांगले आहे.