फिटनेससाठी नॉर्डिक...; नॉर्डिक आहाराचे फायदे

मृणाल तुळपुळे
Monday, 4 January 2021

नॉर्डिक देशातील भौगोलिक परिस्थिती बघता तिथे वर्षातील सहा महिने बर्फ असतो. नॉर्डिक आहारात अतिशय कमी उष्मांक व कार्बज असून, त्यायोगे शरीराला भरपूर प्रथिने, नैसर्गिक साखर व ओमेगा ३ मिळते.

नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड आणि आइसलॅंड या नॉर्डिक देशातील काही आहारतज्ज्ञ, डॉक्‍टर्स व शेफनी एकत्र येऊन २००४ मध्ये एका आहारपद्धतीची आखणी केली. त्यांनी यामध्ये त्या भागात पिकणारी धान्ये, फळे व भाज्यांचा समावेश केला व पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आधार घेत योग्य अशी आहारपद्धती तयार केली. यामागे स्थानिक लोकांतील स्थूलतेचे प्रमाण कमी करणे व देशातील शेतीव्यवसायाला चालना देणे, हे दोन मुख्य उद्देश होते. 

हेही वाचा - हृदय रुग्णांनो, थंडीत आरोग्य सांभाळा! रक्तप्रवाहात अडथळ्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नॉर्डिक देशातील भौगोलिक परिस्थिती बघता तिथे वर्षातील सहा महिने बर्फ असतो व त्या काळात कोणतेही पीक घेता येत नाही. त्या देशात राय, बार्ली, ओट्स अशी धान्ये; बटाटा, टर्निप, रताळे, गाजर अशी कंदमुळे; कोबी, मशरूम्स, नवलकोल, मटार अशा भाज्या तसेच अनेक रंगांच्या व स्वादाच्या बेरीज मुबलक प्रमाणात पिकतात. ही फळे, भाज्या, मासे व मीट थंडीच्या काळात खाण्यासाठी गोठवून ठेवल्या जातात. शेफनी हे सर्व घटक वापरून चविष्ट व आरोग्यकारक अशा पदार्थांची लोकांना ओळख करून दिली.

सकाळी लवकर उठायचे आहे, पण मन मानत नाही; करून बघा काही उपाय

नॉर्डिक आहारात अतिशय कमी उष्मांक व कार्बज असून, त्यायोगे शरीराला भरपूर प्रथिने, नैसर्गिक साखर व ओमेगा ३ मिळते. सुपरफूड मानल्या जाणाऱ्या व अनेक पोषणमूल्यांनी परिपूर्ण अशा बेरीजचा आणि कॅनोला तेलाचा वापर हे नॉर्डिक आहाराचे वैशिष्ट्य आहे. या आहारात कोणत्या घटकांचे किती प्रमाणात सेवन करावे व काय खाऊ नये, याची चार भागांत विभागणी केली गेली आहे. 

 भरपूर प्रमाणात खावे : बेरीज, फळे, भाज्या, होल ग्रेन्स, राय, मासे, तेलबिया, वनौषधी, मसाले, कमी स्निग्धांश असलेले दूध, दही व कॅनोला तेल.

 मध्यम प्रमाणात खावे : रेनडीअर मीट, चिकन, अंडी, चीज आणि लोणी.

 कधीतरी खावे : रेड मीट व प्राणिजन्य फॅट्‌स.

 आहारातून वर्ज्य करावे : साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेये, फास्ट फूड. 

नॉर्डिक आहाराचे फायदे 
 अतिशय सात्त्विक व कमी उष्मांक असणारा हा आहार वजन कमी करण्यासाठी वा वजन आटोक्‍यात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. 
 या आहारात सोडियम, सॅच्युरेटेड फॅट्‌स व साखरेचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाते तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व मधुमेह अशा आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about benefits of the Nordic diet