भारतीय पोषण खजिना

डॉ. मनीषा बंदिष्टी, ओबेसिटी आणि लाइफस्टाईल मॅनेजमेंट कन्सल्टंट
Tuesday, 20 October 2020

आपण उच्च पोषणयुक्त भारतीय अन्नघटक माहीत करून घेणार आहोत. हे पदार्थ अनेकांना माहीत असतील; पण त्यांच्याद्वारे होणारे उत्तम आर्थिक फायदे फार कमी जणांना माहीत असतील, त्यामुळे आपण त्यांची माहिती करून घेऊ.

खरे तर आपल्या देशात उपयोगी पडतील अशा डाळी, कडधान्ये, फळे आणि भाज्या आपल्या देशातच तयार होतात. मात्र, त्यांच्या आरोग्यविषयक लाभांबाबत फार प्रसार न झाल्याने आणि फास्ट फूडचे अतिमार्केटिंग झाल्याने भारतीय पदार्थांत त्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत या पारंपरिक पोषण खजिन्याचे फायदे पोचविणे आणि माहिती देत राहणे आवश्यक आहे; अन्यथा हा ‘ग्रेट भारतीय पोषण खजिना’ कायमचा लुप्त होण्याची शक्यता आहे. 

या मालिकेत आपण उच्च पोषणयुक्त भारतीय अन्नघटक माहीत करून घेणार आहोत. हे पदार्थ अनेकांना माहीत असतील; पण त्यांच्याद्वारे होणारे उत्तम आर्थिक फायदे फार कमी जणांना माहीत असतील, त्यामुळे आपण त्यांची माहिती करून घेऊ.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अळूची पाने 
(कोलोकॅशिया लीव्हज्)

अळूची पाने महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांना ‘अरबी के पत्ते’ किंवा ‘कोलोकॅशिया लीव्हज्’ असे म्हटले जाते. 
हे संपूर्ण झाडच पोषणयुक्त आहे. 
अळूची पाने, त्याचे देठ आणि मुळेसुद्धा स्वयंपाकात वापरली जातात आणि त्यांच्यातून खूप उच्च पोषण मिळते. मात्र, हे घटक कधीही कच्चे खाता कामा नयेत. अळूची पाने अगदी सहज उपलब्ध होतात आणि 
स्वस्त असतात. 
अळू अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतो आणि त्यामुळे आजार रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अळू खूप चांगला असतो. 

हेही वाचा : 'भूले बिसरे खाने'

महत्त्वाचे पोषक घटक 
 अळू हा व्हिटॅमिन ‘ए’चा अतिशय चांगला स्रोत आहे. दृष्टी सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्त्वाचे असते. 
 व्हिटॅमिन ‘सी’चा उत्तम स्रोत; जो प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. 
 त्यांच्यात पोटॅशिअम आणि फोलेटही उत्तम प्रमाणात असते; ज्यामुळे तुमचे हृदय आरोग्यदायी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 या पानात असलेले फायबर्स (तंतू) तुमची पचन यंत्रणा उत्तम राहण्यासाठी मदत करतात. 
 अळूमध्ये लोह, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन ‘बी ६’, व्हिटॅमिन ‘सी’, कॉपर आणि मॅंगेनीझही असते. हे सगळे घटक आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अळूमुळे आरोग्यविषयक फायदे
 रक्तदाब कमी होऊ शकतो, त्वचेची जपणूक होते.
 पचनशक्ती सुधारते. पचन यंत्रणा मजबूत होते.
 हृदयरोगांना प्रतिबंध होतो.
 दृष्टी सुधारते.
 प्रतिकारशक्ती वाढते. 
 स्नायू आणि चेतासंस्था यांची ताकद वाढते.
 ढाळ, क्रॅंपिंग, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेस या सगळ्या गोष्टींना अळूमुळे प्रतिबंध होतो आणि शरीराचे एकूण आरोग्य सुधारते.

अळूची कोशिंबिर
 अळूच्या देठांची साले काढा. ते बारीक चिरा. 
 ते एका भांड्यात थोडे पाणी घालून, त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा आणि पाणी गाळून घ्या.
 हे देठ थोडा वेळ गार होऊद्यात.
 त्यांच्यात दही, मीठ, साखर आणि हिंग घाला.
 सर्वांत शेवटी त्याला हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Indian Nutrition Treasure Colocasia-leaves