Video : माझा फिटनेस : फिट राहायला आवडते

भाग्यश्री मोटे, अभिनेत्री
मंगळवार, 24 मार्च 2020

सध्याच्या काळामध्ये वेलनेस आणि फिटनेस जपणं खूपच महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जपण्यासाठी मी खूप प्रयत्न करते. कोरोनामुळे जिम बंद असल्याने मी सध्या बेले डान्सिंग, कथकचा सराव करत आहे. त्याचबरोबर सूर्यनमस्कारही घालते. जिम सुरू असताना त्या वेळी वेट ट्रेनिंग, फ्री वे एक्‍सरसाइज (फंक्‍शनल) करत होते. एक्‍सरसाइजपूर्वी वॉर्मअप व स्ट्रेचिंगही करते. अंदाजे दीड तास मी जिममध्ये असते. विशेष म्हणजे, व्यायामामध्ये कधीच खंड पडू देत नाही.

माझा आहार खूपच साधा आहे. सकाळी मी नाश्‍ता भरपूर करते. दुपारच्या जेवणामध्ये एक पोळी आणि भाजीचा समावेश असतो. संध्याकाळी भेळ खाते. त्याचप्रमाणे दिवसभरात कधी भूक लागली, तर सीझनल फळे खाते. मी दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी जरुर पिते. मात्र, रात्री आठनंतर जेवण करत नाही. त्याऐवजी बॉइल्ड स्वरूपाचे काहीतरी खाते. मला शाकाहारी पदार्थांबरोबर फिशही खूप आवडतात.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यायाम आणि आहाराची पथ्ये आपण सर्वांनीच पाळल्यास अनेक आजार दोन हात दूर राहतात. मनःशांतीसाठी मी योगासने आणि प्राणायाम करते. अनेकदा गाणीही ऐकते. मला नव्वदच्या दशकातील गाणी खूप आवडतात. मी अनेकदा वाचनही करते.

त्यातूनही मला मनःशांती मिळते. अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हा कलाकारांना फिटनेसबाबत खूपच जागरूक राहावे लागते. ‘पाटील’ चित्रपटाच्या वेळी मी स्नायूंचचाविचार करता हेल्दी होते. पण, तेलगू चित्रपटासाठी लीन, झिरो फिगर अपेक्षित होती. त्यामुळे मी विशिष्ट डाएट फॉलो केले होते. मुळातच मला नेहमीच फिट राहायला आवडते. त्यातच माझे वेटही आयडियल आहे. 

फिटनेसबद्दल माझी आयडॉल शिल्पा शेट्टी आहे. तिने सर्वच गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने मेन्टेन केल्या आहेत. तिची लाइफ स्टाईलही खूपच छान आहे. माझे कुटुंबीयही वेलनेस आणि फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. मी करीत असलेले व्यायाम, गोष्टी तेही फॉलो करतात. माझे चाहतेही अनेकदा माझ्याकडून हेल्दी लाइफ स्टाईलच्या टिप्स घेतात. 
शब्दांकन - अरुण सुर्वे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article bhagyashri mate on fitness