माझा फिटनेस : फिट असणं गरजेचं

Bhushan-Pradhan
Bhushan-Pradhan

तुझं फिटनेस रुटीन कसं असतं?
भूषण : आठवड्यातून सहा दिवस जिममध्ये वर्कआउट करतो. सहा दिवस शक्य नसेल तर निदान चार दिवस तरी मी नक्कीच वर्कआउट, स्ट्रेचिंग, योगा करतो. चित्रीकरणानिमित्त बाहेर असल्यास जवळपास असलेल्या जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. जिम उपलब्ध नसल्यास मी माझा पर्याय ठेवतोच. ‘अजिंक्‍य’ चित्रपटाचं चित्रीकरण जत यासारख्या ग्रामीण भागात असल्यानं तिथं जिम नव्हती; पण त्याला पर्याय म्हणून हॉटेलच्या रूमवर जोरबैठका काढायचो. रेझिस्टंस ट्यूब, स्ट्रेच बँडचा वापर करून व्यायाम करायचो. व्यायाम सुरू करण्याआधी ब्लॅक कॉफी, व्यायाम सुरू असताना बीसीएए ड्रिंक घेतो. त्यामुळे वर्कआउट करताना ऊर्जा मिळत राहते. व्यायामानंतर प्रोटीन शेक घेतो. 

तुझा आहार कसा असतो?
भूषण : मला बाहेरचं खायला आवडत नाही. तसेच, गोड पदार्थ मुळात आवडत नसल्यामुळे माझं अर्धं डाएट तिथंच यशस्वी होतं. चित्रीकरणानिमित्त बाहेर असताना लोकेशनवर नेहमीच डाएट शक्‍य होईल असं नाही. अशावेळी उकडलेली अंडी, चिकन, भाज्यांचे सलाड, पालेभाज्या आहारात असतात. त्याचप्रमाणे दिवसभरात भरपूर पाणी पितो. त्याचप्रमाणे वेगवेगळी फळंही खातो.

फिटनेसबद्दल आव्हान स्वीकारावं लागलं?
भूषण : ‘अजिंक्‍य’ चित्रपटात एका तरुण व्यावसायिकाच्या भूमिकेत असल्यानं पिळदार शरीरापेक्षा हेल्दी बॉडी हवी होती. तेव्हा त्यानुसार आहारात बदल केला. ‘गोंद्या आला रे’ या वेबसीरिजमध्ये दामोदर हरी चापेकर यांची भूमिका करत असताना जिममधल्या बॉडीपेक्षा बारीक; पण पिळदार शरीरयष्टी हवी होती. तेव्हा वजन जवळजवळ पाच ते सात किलोने कमी केलं. आता तशीच बॉडी मला आवडतेय. आज-काल बरेच कलाकार आपल्या शरीरयष्टीमध्ये बदल करण्यासाठी खूप मेहनत घेतात. ते खरंतर आव्हानच असतं.

फिटनेस आदर्श कोण आहेत?
भूषण : स्मिथ ज्युलियन एक इन्स्टाग्रामर, त्याचं वर्कआउट मी खूप आवडीनं फॉलो करतो. माझा आवडता बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन, त्याचबरोबर मिलिंद सोमण यांना मी मनापासून फिटनेसचा आदर्श मानतो. हृतिक चित्रपटसृष्टीत आल्यापासून त्याची फिट बॉडी राहिली आहे, जी मला खूप आवडते. माझ्या मते बिल्ड परफेक्‍ट असण्यापेक्षा फिट असणं गरजेचं आहे.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com