योग ‘ऊर्जा’ : ‘अथ योगानुशासनम्!’

Yoga
Yoga

आपल्यातल्या दुःखाचे, अशांततेचे मूळ आपले मन अनावश्यक गोष्टींशी संलग्न होणे हे आहे. आपण जिथे मन जोडतो तिथे आणि त्याच प्रकारच्या विचारांचे थैमान सुरू राहते. पतंजली मुनी म्हणतात ‘वृत्तिसारूप्यमितरत्र’ तसं वृत्ती म्हणजे आपले विचार बेशिस्त असतात तेव्हा ते विषयांमध्ये सारूपता पावतात. शिस्त ही कशाची असावी, तर योगाची! ‘अथ योगानुशासनम्!’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझी एक मैत्रीण आहे, ती एके दिवशी खूप मोठी राष्ट्रीय पातळीवरची सौंदर्य स्पर्धा जिंकली. काही दिवसांनी तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जायचे होते. सहाजिकच तिच्या जिंकण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. ती पूर्णपणे विसरून गेली होती की त्या क्षणी तिच्या खात्यात फक्त ५९ रुपये उरले होते. तिचे लक्ष दोनच गोष्टींकडे होते, तो आनंदाचा क्षण आणि पुढील मोठी संधी! तिची भौतिक परिस्थिती तिच्या आनंदाच्या आडच येत नव्हती. त्यादिवशी मला असं वाटलं, की कधीकधी आपण भरलेल्या अर्ध्या ग्लासकडे दुर्लक्ष करून रिकाम्या भागावर नको इतकं चिंतन का करतो? आपण किती वेळा अगदी शंभर टक्के वर्तमानात म्हणजे अगदी ‘या’, ‘आत्ताच्या’ क्षणात असतो? इतके की बाकी काहीच महत्त्वाचे वाटत नाही. आपण कितीवेळा इतके व्यापक बनतो की आपल्या अस्तित्वाचेही आपल्याला भान राहत नाही? याउलट आपले होते काय, की आपण घरी असल्यावर डोक्यात बाहेरचे विषय आणि बाहेर असल्यावर घरचे. मग आपण नक्की असतो कुठे? हरवलेले? भिरभिरलेले? की चाचपडत!

आपल्यातल्या दुःखाचे, अशांततेचे मूळ आपले मन अनावश्यक गोष्टींशी संलग्न होणे हे आहे. आपण जिथे मन जोडतो तिथे आणि त्याच प्रकारच्या विचारांचे थैमान सुरू राहते. पतंजली मुनी म्हणतात ‘वृत्तिसारूप्यमितरत्र’ तसं वृत्ती म्हणजे आपले विचार बेशिस्त असतात तेव्हा ते विषयांमध्ये सारूपता पावतात. शिस्त ही कशाची असावी, तर योगाची! ‘अथ योगानुशासनम्!’

योगमार्गावर चालत असताना मनाची एके ठिकाणी ‘स्व’स्थ राहण्याची व रमण्याची तयारी होत जाते. अशाने अगोदर पाहिल्याप्रमाणे आपण पूर्णपणे ‘now’ मध्ये राहायला शिकतो. ‘Awareness on breath is as present as you can be!’ Awareness म्हणजे जागरूकता जितकी वाढेल तितके आपले हरवून जाणं, भिरभिरेपणा आणि चाचपडणे कमी होत जाईल.

आसन-प्राणायामापलीकडे जाऊन आपण ध्यानात रमू लागतो, तेव्हा एक प्रकारची व्यापकता येत जाते. शरीर-मनाच्या पलीकडील अस्तित्वाची जाणीव चाखू लागलात की आपल्या एरवी सीमित असलेल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात. मनाची खरी क्षमता किती उच्चांकाला जाऊ शकते याची जाणीव होऊ लागते. भौतिक विषयांमध्ये अडकून आपण आपले अस्तित्व किती लहान आणि क्षुद्र मानून जगतो हे पण कळू लागेल. ज्यावेळी कुठली गोष्ट तुम्हाला खटकेल किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होईल तेव्हा स्वतःला दोन प्रश्न विचारा.

1) याक्षणी मला हा विचार करून मन गुंतवून ठेवणे आवश्यक वाटते का?
2) हे विचार माझ्या अंतिम ध्येयाला उपयोगाचे आहेत का?

व्यावहारिक आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात, जेव्हा पूर्णपणे अशा पद्धतीने किंवा आयडियल जगणे शक्य नसते. परंतु शक्य तितके  जागरूकतेने स्वतःकडे आणि प्रसंगांकडे पाहण्याचा सराव केल्यास नक्कीच दृष्टिकोन बदलत जाईल आणि आंतरिक प्रगती व्हायला मदत होईल. मग फक्त योगासने, प्राणायाम आणि ध्यान इतक्यापुरताच योग न राहता दिवसभर योगिक तत्त्वांवर जगत तशी जीवनशैलीच (yogic lifestyle) विकसित होऊ लागेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com