इनर इंजिनिअरिंग : नैतिकता हा उपाय नाही

सद्‌गुरू
Tuesday, 29 September 2020

भारत एक संस्कृती म्हणून यात नैतिकता नाही. या देशात आपण कधीच नैतिकता आणि नीतिशास्त्रावर भर दिला नाही. तुम्ही पाश्चिमात्य देशांत गेलात, तर त्या संस्कृतीत कठोर नैतिकता दिसून येते. आपल्या देशात नैतिकता नाहीये, आजच नव्हे, तर नेहमीच. नैतिकता नेहमीच मानवी जाणीवेला सीमित करणारी म्हणून आपण पाहिले. आपली आयुष्ये, आपला समाज आणि आपल्या सभोवतालचे जग नैतिकतेच्या चौकटीतून आपल्याला हाताळायला नकोय. आपल्या संस्कृतीने कधीच हे चूक आहे, हे बरोबर असे म्हटलेले नाही.

भारत एक संस्कृती म्हणून यात नैतिकता नाही. या देशात आपण कधीच नैतिकता आणि नीतिशास्त्रावर भर दिला नाही. तुम्ही पाश्चिमात्य देशांत गेलात, तर त्या संस्कृतीत कठोर नैतिकता दिसून येते. आपल्या देशात नैतिकता नाहीये, आजच नव्हे, तर नेहमीच. नैतिकता नेहमीच मानवी जाणीवेला सीमित करणारी म्हणून आपण पाहिले. आपली आयुष्ये, आपला समाज आणि आपल्या सभोवतालचे जग नैतिकतेच्या चौकटीतून आपल्याला हाताळायला नकोय. आपल्या संस्कृतीने कधीच हे चूक आहे, हे बरोबर असे म्हटलेले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय संस्कृतीने आजच्या काळात काय योग्य आहे एवढेच सांगितले. उद्या काय अनुकूल असेल ते वेगळे असू शकते. तुम्ही हे पाहाल, तुम्ही पुजणारा प्रत्येक दैवी अवतार श्रीराम, श्रीकृष्ण, शिवशंकर, तुम्ही त्यांना नैतिकतेच्या दृष्टीने अचूक लोक म्हणू शकत नाही. ते तसे नाहीत. आपण नैतिकतेची कास धरावी असे कधीच त्यांना वाटले नाही. तरीसुद्धा मानवी जाणीवेचे ते शिखर आहेत.

नैतिकता म्हणजे तुम्ही पुनरावृत्तीचे चक्र बनता. तुम्ही पुनरावृतीत अडकलात तर चक्राकार आयुष्यात हेलकावे खात राहणार. तुम्ही चक्रांमध्ये अडकलात, तर तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून या संस्कृतीत आपण मानवी जाणीव उंचावण्याची जोखीम उचलली. आपल्या लोकसंख्येपैकी भरपूर लोकांनी नैतिकतेचे धडे देण्यात नव्हे, तर मानवी जाणीव उंचावण्यात आयुष्य खर्ची घातले. हा एक धोकादायक मार्ग आहे, परंतु शेवटी मानव जातीला हाताळण्याचा हा एकुलता एक मार्ग आहे. लोकांवर तुम्ही नैतिकता लादली, तर लोक योग्य अयोग्य असे पुष्कळ काही करतील आणि मग त्यांना त्याबाबत अपराधीपणा वाटू लागेल आणि म्हणून मग देवळात जाऊन देवाला काही अर्पण करतील आणि त्याच त्याच गोष्टी करत राहतील. आज लोक असं करत आहेत. नाही का? 

आपल्या संस्कृतीत देवाने कोणत्याही आज्ञा घालून दिलेल्या नाहीत. कुणीही तुम्हाला सांगितले नाही, तुम्ही काय करावे आणि काय करू नये. आम्ही तुम्हाला फक्त एवढेच सांगितले, तुम्ही स्वतःला कसं घडवलं आणि ठेवलं पाहिजे. ही लोकांना शिकवण्यासाठीची अतिशय कठीण गोष्ट आहे. दहा आज्ञा सहज लिहून दिल्या जाऊ शकतात, परंतु मनुष्याची जाणीव वृद्धिंगत करणे सोपे नाही. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हे कार्य अनेक लोकांना सहभागी केल्यास घडू शकते व ते सर्वत्र उपलब्ध होते. पालक, शेजारी आणि सभोतालचं वातावरण तसे असेल्यास मुले आपोआप त्याप्रकारच्या जाणीवेसहित वाढतील. मात्र, आज देशात आपण अशा वळणावर आलो आहोत, जिथे मानवी जाणीव उंचावण्याच्या दिशेने पुरेसे कार्य झालेले नाही.

आपल्यात नैतिकतेचा मागमूसही नाही. पाश्चात्य संस्कृतीतून नैतिकता उचलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जी आपल्यासाठी अनोळखी आहे, आणि ती इथे कार्य करू शकणार नाही. कारण, ती तिथे सुद्धा कार्य करू शकली नाही!

तुम्हाला स्वदेशी असं काही हवं असेल (स्वदेशी म्हणजे या राष्ट्राशी संबंधित नव्हे, तर तुमच्या अवघ्या अस्तित्वाशी निगडित), तर मग लोकांवर नैतिकतेच्या आज्ञा लादण्याची गरज नाही. कारण संधी मिळताच लोक त्या पायाखाली घालतील. मानवी जाणीव उंचावण्याच्या दिशेने आवश्यक  प्रयत्न करणे हा एकमेव मार्ग आपल्याजवळ आहे, मानवता जागृत ठेवण्याचा...

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sadguru Morality is not the solution

Tags
टॉपिकस
Topic Tags: